दोंडाईचा येथील सुवर्ण मंगल कार्यालयात ६ दिवस चालणार पुस्तक प्रदर्शन – लायन्सचा स्तुत्य उपक्रम 

570
दोंडाईचा, धुळे – (प्रतिनिधी, समाधान ठाकरे) : आज समाजात मोबाईल नेटवर्किंगच्या माध्यमातून नवनवीन  गोष्टी जाणून घेण्यासाठी सोशल मीडिया जरी कार्यरत राहिला तरी पुस्तके वाचनातून माणसाचे ज्ञान समृद्ध होते, म्हणून आजच्या धावपळीच्या काळात लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यत लोकांना पुस्तके वाचनाकडे वळविण्यासाठी ” पुस्तक प्रदर्शन ” भरविणे गरजेचे आहे. दोंडाईचा येथील सुवर्ण मंगल कार्यालय येथे दिनांक २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता “मराठी पुस्तक प्रदर्शनाचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लायन्सचे हे काम समाजात खूप ऊल्लेखनीय असल्याचे मत जनमानसात उमटत आहे. सहा दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचे ऊद्घाटन व्यापारी असोसिएशनचे के. एम.अग्रवाल यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष डॉ.एस. पी. गिरासे, पी. बी. बागल महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. पाटील, डी आर. बी. ओ. डी. हायस्कूलचे प्राचार्य एम. एस. पाटील, व्ही.जे.एन.टी.आश्रम शाळेचे मुख्याध्यापक ए. जे. पाटील, वसुधा पब्लिक स्कूलच्या प्राचार्य श्रीमती अंशुल कपूर, दादासाहेब रावल महाविद्यालयाचे प्राचार्य के. डी. गिरासे, नुतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. डी. पाटील, अहिंसा पालीटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य हर्षल गुप्ता, रोटरी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य एम. पी. पवार, आर. डी. एम. पी. हायस्कूलचे प्राचार्य डी. एन. जाधव , स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सुरेखा राजपुत, हस्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य हरिकृष्ण निगम, नगरसेवक निखिल राजपूत, डॉ. ललितकुमार चंद्रे, डॉ. प्रफुल्ल दुग्गड, अनिल खंडेलवाल, प्रफुल्ल साळुंखे, कुलदीप राजपूत, चोईथ कुकरेजा, संजय सराफ, धनंजय नेरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष राकेश अग्रवाल, सचिव व्हि. एम. पाटील, खजिनदार आशिष अग्रवाल आदींसह संपुर्ण टीम व मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *