प्रल्हाद शिक्षण मंडळाच्या विध्यार्थ्यांचे पंचाय समितीसमोर आंदोलन

422
वाडा, (-प्रतिनिधी, संजय लांडगे) : वाडा तालुक्यातील मानिवली गावात असलेल्या प्रल्हाद शिक्षण मंडळाच्या शाळेमार्फत दहावीच्या विद्यार्थ्याना आजवर निकाल न दिल्याने त्यांचे पुढील भवितव्य अंधारात आहे. यासाठीच न्याय मिळावा म्हणून विदयार्थी व पालक यांनी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून पंचायत समिती कार्यालयात आंदोलन केले यावेळी संबंधितांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मानिवली गावात प्रल्हाद शिक्षण मंडळ या संस्थेकडून आठवी ते दहावी अशी शाळा सुरू करण्यात आली होती या शाळेत पीक, खैरे, सासणे, कुंभिस्ते अश्या अनेक गावातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. शाळेची वाटचाल अगदी सुरुवातीपासून अतिशय गचाळ असल्याने ही शाळा अनधिकृत असल्याचे शासनाकडून अनेकदा सांगण्यात आले होते मात्र तरीही गोरगरीब पालकांनी आपल्या मुलांना या शाळेत प्रवेश देत शिक्षण मिळेल अशी अपेक्षा केली होती. शाळेने मागील वर्षी येथे दहावीला प्रवेश घेतलेल्या 51 विध्यार्थ्यांचे निकाल दिलेच नाहीत ज्यामुळे त्यांना पुढे प्रवेशासाठी अडचणी आल्या याबाबत अनेकदा शाळेला सांगूनही त्यांनी काहीही समाधान न केल्याने अखेर येथील विद्यार्थी व पालक यांनी श्रमजीवी संघटनेच्या मदतीने पंचायत समिती कार्यालय गाठून आम्हाला आमचे निकाल व दाखले देण्यात यावे असा न्याय मागितला. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरल्यावर अखेर 4 ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थ्यांना दाखले व निकाल देतो असे लेखी आश्वासन देण्यात आले तसेच जर लेखी आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर संस्थेवर गुन्हा दाखल करू असे लेखी आश्वासन पंचायत समिती मार्फत देण्यात आले. यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *