आलेगाव मध्ये खेळला जातो, मैदानी ” आटया-पाटया ” खेळ 

769
आलेगाव, ता. पातूर (-प्रतिनिधी श्रीधर लाड) : सध्याच्या स्मार्टफोन युगात, स्मार्टफोन, संगणक,व टीव्हीच्या वाढत्या वापरामुळे आजचे नवयुवक मैदानी खेळ विसरले आहेत, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परंतु ह्या सर्व इलेक्ट्रॉनिक खेळाला फाटा देत अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगावातील युवक रोज सायंकाळी मैदानी “आटया-पाटया” खेळ खेळण्यासाठी मोठया संख्येने माळीभवन मैदानामध्ये खेळत असतात. त्यांचा खेळ पाहण्यासाठी युवकांसह आबालवृद्ध उपस्थित असतात. मैदानी खेळांचे महत्व नव्याने सांगण्याची गरज नाही सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ अत्यावश्यक आहे, त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यही टिकून राहते,मात्र सद्याच्या स्मार्टफोन युगात, मैदानी खेळांचे प्रमाण जगभरात सर्वत्रच कमी होताना दिसत आहे, मैदानी खेळांपासून दुरावलेल्या मुलांवर संगणक, स्मार्टफोन, टीव्ही वरील खेळामुळे अनेक आजार बळावण्याचे प्रकार वाढत आहेत.अनेक युवकांवर स्मार्टफोनवर सतत खेळ खेळण्याचे वाईट दुष्परिणाम जाणवू लागल्याचे अनेक वृत्त आहेत, सदर दुष्परिणाम आपल्यामध्ये घडून येऊ नये, याची दक्षता घेऊन अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव येथील माळीपूऱ्यातील युवक स्मार्टफोन वरील खेळा ऐवजी दररोज सायंकाळी मैदानी आटया पाटया खेळ, गेल्या पंधरा दिवसां पासून खेळत आहेत,सदर खेळामध्ये आठ खेळाडू सहभागी असतात,सदर खेळामुळे अनेक युवकांच्या हातातील स्मार्टफोन फक्त संवादासाठीच राहल्याचे युवकांनी सांगितले,इतर युवकांनी सुध्दा स्मार्टफोन वरील खेळ खेळण्या ऐवजी मैदानी फुटबॉल, कबड्डी,कुस्ती,क्रिकेट,आटया पाटया आदी खेळ खेळून आपले शारीरिक,मानसिक आरोग्य टिकवावे असे माळीपुऱ्यातील युवकांनी इतर युवकांना संदेश दिला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *