तळेगाव ढमढेरे येथील वारकरी सांप्रदायातील जेष्ठ कार्यकर्ते ह.भ.प.आनंद यशवंत ढमढेरे यांचे वृध्दपकाळाने निधन  

462

      शिक्रापूर,शिरुर : (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) – शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे (भिमाशेत ) येथील जुन्या पिढीचे वारकरी सांप्रदाय क्षेञातील ह.भ.प.आनंद यशवंत ढमढेरे यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ५ मुले २ मुली,१३ नातवंडे, ८ पंतवडे असा मोठा परिवार आहे . ढमढेरे यांनी सलग ४० वर्षे आंळदी ते पंढरपूर विणेकरी होत पायवारी केली. शेवटच्या क्षणापर्यंत ते  विना चष्मा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे वाचन करीत असत. पुणे जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीकांत ढमढेरे यांचे ते चुलते व उद्योजक सुभाष ढमढेरे यांचे ते वडील होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *