अण्णापूर,पुणे : पदवीधर शिक्षक संघटनेच्या प्रतिष्ठित ‘स्वर्गीय धर्मराज कर्पे स्मृती पुरस्कारांची घोषणा 

519
             अण्णापूर,पुणे : पदवीधर शिक्षक संघटनेच्या प्रतिष्ठित ‘स्वर्गीय धर्मराज कर्पे स्मृती पुरस्कारांची घोषणा – विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी बांधिलकी असणाऱ्या व शिक्षकांच्या हक्कासाठी सनदशीर मार्गाने संघर्ष करणाऱ्या शिरुर तालुक्यातील सर्वात मोठी शिक्षकांची संघटना असणाऱ्या  शिरुर तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या प्रतिष्ठित तिसऱ्या  स्वर्गीय धर्मराज कर्पे स्मृती पुरस्कारांची नुकतीच घोषणा नुकतीच करण्यात आली.    या संघटनेने नेहमीच शालेय  गुणवत्तावाढीसाठी प्रोत्साहन दिले असुन , शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा , दहावी , बारावीतील गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक यांचा गौरव केला आहे. संघटनेचे माजी अध्यक्ष  धर्मराज कर्पे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘स्वर्गिय धर्मराज कर्पे स्मृती पूरस्कार,  शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील किल्ले भ्रमंतीबरोबर दुर्गसंवर्धन व जनजागृती, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आदर्श मातांचा गौरव , पर्यावरण रक्षण व संवर्धन यासाठी वृक्षलागवड यासारखे अनेक उपक्रम राबविले आहेत . यावर्षीच्या पुरस्कारांच्या नियोजनासाठी पदवीधर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल पलांडे यांच्या मार्गदर्शनानुसार शहाजी पवार  यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सभा संपन्न झाली त्यावेळी संघटनेचे तालुका सरचिटणीस सुरेश खैरे व कार्याध्यक्ष प्रदिप थोरात यांनी हे पुरस्कार जाहिर केले. यावेळी संघटनेच्या तालुका कार्याध्यक्षपदी निवड झालेले खंडाळे शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक नरहरी नरवडे यांचा सन्मान तालुकाध्यक्ष शहाजी पवार व जिल्हाध्यक्ष अनिल पलांडे यांचे हस्ते करण्यात आला. पदवीधर संघटनेच्यावतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्ठित अशा स्वर्गीय धर्मराज कर्पे स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असुन त्यांचे वितरण  वितरण तळेगाव ढमढेरे(ता.शिरुर )येथील शिक्षक भवन येथे रविवार दिनांक ७ रोजी दुपारी १ वाजता संपन्न होणार असुन या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार , पोपटराव गावडे, सुर्यकांत पलांडे, पंचायत समितीचे सभापती विश्वासआबा कोहकडे यांच्यासह सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार सोहळयासाठी सर्वानी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष शहाजी पवार, सरचिटणीस सुरेश खैरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा वंदना पाचर्णे यांनी केले.
    यावेळी पदवीधर शिक्षक संघटनेचे तालुका व जिल्हास्तरावरील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
तिस-या स्वर्गीय धर्मराज कर्पे स्मृती पुरस्काराचे मानकरी   
आदर्श शाळा – (गट इ.१ली ते ४थी ) – जि.प.प्राथमिक शाळा जांभळीमळा. (गट इ.१ली ते ७वी )- जि.प.प्राथमिक शाळा दरेकरवाडी.              जीवन गौरव पुरस्कार – दत्तात्रय विष्णू शिंदे (केंद्रप्रमुख टाकळीहाजी),आदर्श शिक्षक पुरस्कार – संतोष पांडुरंग वेताळ ( जि.प.शाळा.कांडगेवस्ती , न्हावरे), मोहन पोपट आनोसे (जि.प.शाळा शिंदेवस्ती, रांजणगाव सांडस ),चंद्रसेना विश्वनाथ शेळके (जि.प.शाळा हिवरेकुंभार ), प्रमिला बाळासाहेब इचके ( जि.प.शाळा कवठे येमाई ),साधना अरुण खोमणे, (जि.प.शाळा साबळेवाडी , टाकळीहाजी ) अध्यात्मिक क्षेत्र पुरस्कार  – ह.भ.प.विलास महाराज भोंगळे, आदर्श कार्यकर्ता पुरस्कार – गुलाबराव दगडु तळोले (जि.प.शाळा खैरेवाडी), जगन्नाथ बापुराव कदम (जि.प.शाळा सादलगाव) , वासंती रविंद्र साखरे (जि.प.शाळा कोरेगाव भिमा )              * साहित्यरत्न पुरस्कार – मधुकर रावजी गिलबिले, पत्रकारिता पुरस्कार  – नागनाथ शिंगाडे, क्रीडा पुरस्कार – अवधुत गोविंद कदम ( राज्यस्तरीय खेळाडू ), गुणवंत विद्यार्थी पुरस्कार  – सृष्टी संतोष गायकवाड (इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा राज्यगुणवत्ता यादीत स्थान ), रेणुका धनाजी धुमाळ, वैष्णवी धनाजी धुमाळ (इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा राज्यगुणवत्ता यादीत स्थान )
  विशेष पुरस्कार – जि.प.प्राथमिक शाळा कोंढापूरी (अध्यक्ष चषक प्राप्त शाळा ), राजेंद्र दत्तात्रय टिळेकर ( जिल्हा गुणवंत केंद्रप्रमुख ), एकनाथ पाराजी खैरे ,  विलास बबन पुंडे , आरती शामराव साळुंके ( जिल्हा गुणवंत शिक्षक  )
-प्रतिनिधी,ज्ञानेश पवार,(सा.समाजशील,अण्णापूर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *