उमरखेड,यवतमाळ : आत्महत्या करणे स्वतः मरणे सोडा मारणे शिका सरकार आपले देणे लागते गावात येऊन खोटी आश्वासने देणाऱ्या मंत्र्यांना जाब विचारा,खासदार राजू शेट्टींचे उमरखेडच्या दुष्काळ परिषदेत वादग्रस्त वक्तव्य

712
           उमरखेड,यवतमाळ : उमरखेड येथे गुरुवार  दि.चार रोजी झालेल्या सोयाबीन, कापूस, ऊस दुष्काळ परिषदेत बोलताना  गावात येऊन खोटी आश्वासने देणाऱ्या मंत्र्यांना तुडवा पोलिससुद्धा काहीच करणार नाहीत. तुम्हीच त्यांना मारले पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.उमरखेड येथे गुरूवारी रात्री आयोजित कापूस सोयाबीन,ऊस दुष्काळ मेळाव्यात राजूशेट्टी यांनी शेतकऱ्यांसमोर हे वादग्रस्त विधान केले आहे. राजू शेट्टी सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. राजू शेट्टी यांनी वादग्रस्त वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. ‘खोटी आश्वासने देणाऱ्या मंत्र्यांना आता मारले पाहिजे. तुमच्यात हिम्मत नसेल तर त्यासाठी मी कोल्हापूरमधून माणसे पाठवेन याची वाट पाहू नका. तुम्हालाच त्यांना मारायचे आहे. आता आत्महत्या करणे स्वतः मरणे सोडा मारणे शिका सरकार आपले देणे लागते. आम्ही बॅंकेचे देणे देऊ शकत नाही; मग आम्ही मंत्र्यांना ठोकलं तर बिघडले कुठे?’ असा प्रश्नही त्यांनी केला.
केंद्र सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची फसवणूक केली. त्यांनी ‘अच्छे दिन’ तर आणलेच नाही, उलट ‘लुच्चे दिन’ आणले आहेत. शेतकरी सातत्याने नागविला जात आहे. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी पेटून उठले पाहिजे. शेतकऱ्यांनी शासनाच्या मंत्र्यांना ठोकून काढल्याशिवाय, त्यांना जोडे मारल्याशिवाय न्याय मिळणार नाही. मंत्र्यांना मारले तर पोलिस तुमचे काहीही करू शकत नाहीत. तुमच्यामुळे ते सत्तेत आहे. शासनाला वठणीवर आणण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे, असे प्रतिपादन शेट्टी यांनी केले. ते म्हणाले, ”पश्‍चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस, दुधाची भाववाढ असे आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. आता विदर्भात कापूस, सोयाबीनचे दर घसरले. त्यांना भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत; परंतु शासनाला त्याचे काही देणे-घेणे नाही.” मागील वर्षी च्या सर्व प्रकारच्या चुकऱ्या सह, सरसकट कर्ज माफी सह चालू वर्ष्यात हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई पाहिजे अन्यथा येत्या एकोणीस तारखेला दिल्ली येथे भारतातून लाखोंच्या संख्येने शेतकरी जमा होऊन शासनाच्या विरोधात एल्गार पुकारणाआहे असे विधान शेतकरी संघटनेचेनेते राजू शेट्टी यांनी केले.
– प्रतिनिधी,भारत खंडारे,(सा.समाजशील,उमरखेड)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *