पुणे : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट पुणे येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांचा उदघाटन समारंभ उत्साहात

453
         पुणे : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ही संस्था सन १९२६ सालापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे, मानव कल्याण व प्रगती हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन हि संस्था दर्जेदार शिक्षण,प्रशिक्षण,संशोधन व त्यातील निष्कर्षाचा समर्थपाणे प्रचार करीत आहे. मागील १२ वर्षांपासून पुणे येथील विभागीय केंद्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. याच अभ्यासक्रमांचा शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा उदघाटन समारंभ अभ्यासकेंद्रात आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून प्रा.डॉ.दत्तात्रय वाबळे (सदस्य राज्याशास्त्र अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे) व प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.राजेश गवळी (उप आयुक्त आयकर विभाग पुणे), मा.श्री.योगेश चौधरी (अन्वेषक आदिवासी संशोधन प्रशिक्षण व संस्था पुणे) उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र पुणे येथील मा. श्री.संतोष वामन (सहाय्यक कक्ष अधिकारी) व कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे कार्यकारी संचालक मा.एस.जी.चव्हाण हे उपस्थित होते.
         या कार्याक्रमात समंत्रक व गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.प्रा.डॉ.दत्तात्रय वाबळे यांनी मुलांना आजच्या युगात शिक्षणाचे काय महत्व आहे हे पटवून दिले, मा.श्री.राजेश गवळी यांनी जिद्द असेल तर खेडेगावातील विद्यार्थी सुद्धा कसा अधिकारी होऊ शकतो हे सांगितले, मा.श्री.योगेश चौधरी यांनी आदिवासी भागातील विद्यार्थांना सुद्धा मुक्त विद्यापीठाचा कसा फायदा होत आहे या बद्दल सांगितले आणि मा.श्री.संतोष वामन यांनी विद्यार्थांना मुक्त विद्यापीठात चालणाऱ्या शिक्षणक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक मा.एस.जी.चव्हाण यांनी संस्थेत चालणाऱ्या विविध अभ्याक्रमाविषयी व प्रकल्पा विषयी विद्यार्थांना माहिती दिली व प्रा.डॉ.शोभा कारेकर यांनी मुक्त विद्यापीठातील वाचन साहित्याचा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना कसा उपयोग करून घेता येईल या विषयी मार्गदर्शन केले.
           कार्यक्रमास संस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, पाहुण्यांचे स्वागत सौ.स्मिता राऊत यांनी केले तर गोविंद नामदे यांनी आभार मानले.
– प्रतिनिधी,सचिन दांगडे,(सा.समाजशील,पुणे



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *