आमदार दिलीप वळसे पाटील करणार शिरूरच्या चांडोह येथील नुकसान ग्रस्त भागाची पहाणी – मानसिंग पाचुंदकर पाटील 

910
           कवठे येमाई,शिरूर : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) –  शिरूर तालुक्यातील चांडोह येथे ४ दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या तुफानी वादळी पावसात झालेल्या नुकसानीची व तेथील नागरीकांना यामुळे जाणवत असलेल्या समस्यांची माहिती घेण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा शिरूर-आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील उद्या दि. २ ला सायंकाळी ५ च्या दरम्यान चांडोह येथे भेट देणार असल्याची माहिती शिरूर- आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली.
       मागील ४ दिवसांपूर्वी सायंकाळी अचानक आलेल्या वेगवान वादळासह वाऱ्याने चांडोह परिसरात हाहाकार उडविला. अनेक विजेचे खांब कोसळ्याने विद्युत प्रवाह बंद पडला. वादळाने अनेकांची घरे पूर्ण उध्वस्त झाल्याने संसार उघड्यावर पडले.शेती,शेतीपिके,फळबागांचे मोठे नुकसान झाले. अनेक मोठी झाडे उन्मळून पडली.एकट्या चांडोह मध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून चोहोबाजूंनी संकटात सापडलेल्या शेतकऱयांना आता शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीचा हात देण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.
    चांडोह येथील नैसर्गिक आपत्तीत झळा पोहचलेल्या ठिकाणांची,शेतकऱयांची उद्या शनिवारी आ. दिलीप वळसे पाटील प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी करणार असून शासनस्थरावर येथील नुकसान ग्रस्त शेतकऱयांना,ग्रामस्थांना जी काही तात्काळ मदत व योग्य त्या उपाययोजना करता येतील याबाबतचा पाठवूरावा आ. वळसे पाटील सुरूच ठेवणार असल्याचे मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *