मुरबाड जवळ एसटी व खाजगी बस,कार अपघातात 24 जखमी, अपघातात माजी आमदार दिगंबर विशे यांच्या हाताला फ्रॅक्चर  

591
        मुरबाड,ठाणे : ( प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड जवळील खरब्याची वाडी जवळ गुरुवारी ता 31 रात्री 8 च्या सुमारास एसटी व खाजगी बस समोर समोर धडकल्याने अपघात झाला त्याचवेळी एक कार मागून धडकल्याने एकूण  24 जण जखमी झाले. या अपघातात माजी आमदार दिगंबर विशे,खाजगी बस व एसटी बसचा चालक जखमी झाला. या अपघातामुळे कल्याण माळशेज घाट मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
       मुरबाड येथून खोपिवली येथे जाणाऱ्या एसटी बसला शिर्डीहून कल्याण कडे येणारी खाजगी बस धडकली व या बसला एक खाजगी कार धडकली. एसटी बस मधील 6 प्रवाशी, खाजगी बस मधील 15 व कार मधील 3 असे 24 प्रवाशी या अपघातात जखमी झाले.  या सर्व प्रवाशांना ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारा साठी मुरबाड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती डॉ नरहरी फड यांनी  समाजशीलशी बोलताना दिली.  या अपघातात माजी आमदार दिगंबर विशे यांच्या हाताचे हाड मोडले आहे.  काही प्रवाशांचे हाता पायाची हाडे मोडली आहेत.  मात्र कोणाच्याही डोक्याला मेंदूला मार लागला नसल्याचे सांगण्यात आले.   मुरबाड शहरातील डॉक्टरांची माणुसकी 10 डॉक्टर मदतीला धावले. अपघातग्रस्त बस मधील अडकलेल्या प्रवाशांना ग्रामस्थांनी एक तास शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *