आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची १४४वी जयंती मुरबाड मध्ये उत्साहात साजरी 

448
          मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची १४४ वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
 यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. येथील शिवाजी महाराज चौकात जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे  पूजन करून आदिवासी समाजाला विकासाची चालना देणाऱ्या या जननायकाचा  इतिहास मांडण्यात आला. या प्रसंगी आदिवासी संघर्ष समितीचे राजाभाऊ सरनोबत, मनसे शहर प्रमुख नरेश देसले, यांच्यासह पोलिस पाटील संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष रविंद्र भोईर, साप्ताहिक समाजशीलचे पत्रकार जयदीप अढाईगे,पत्रकार शंकर करंडे,सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गडगे, साप्ताहिक शब्दसत्ताचे संपादक दत्ता माळवे व मोठ्या  संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *