मुरबाड नगरपंचायत च्या तोट्यात असणारा घंटागाडी करार रद्द करण्याची मनसेची मागणी : ओला सुका कचरा उचलणाऱ्या घंटागाडी साठी लाखो रुपये भाडे  

1435
         मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड नगरपंचायत शहरातील ओला व सुका कचरा उचलण्या साठी भाडे तत्वावर घेतलेल्या दोन घंटा गाड्यावर वार्षिक ९ लाख ५० हजार ४०० रुपये भाड्या पोटी अदा करत आहे.  हा भाडे तत्वावरील करार तोट्याचा असून नगरपंचायतने स्वतःची वाहने वापरल्यास भाड्या पोटी जाणारी रक्कम शिलकी स्वरूपात राहील.  या साठी हा करार रद्द करून स्वतःची घंटागाडी घेण्याची मागणी मुरबाड मनसेने केली असून त्या संबंधिचे निवेदन नगरपंचायतला देण्यात आले आहे.
     मुरबाड नगरपंचायतने बालाजी एंटरप्राइजकडे वार्षिक मंजूर दराने मुरबाड शहरातील ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी दोन गाड्या भाडेतत्त्वावर १६५० रुपये दर दिवशी प्रमाणे घेतल्या.  या घंटागाड्याना मासिक ७९ हजार २०० रुपये तर वर्षांकाठी ९ लाख ५० हजार ४०० रुपये मोजावे लागत असल्याने हा करार तोट्याचा असल्याने तो त्वरित रद्द करून स्वतः ची वाहने घ्यावीत अशी मागणी मुरबाड माहाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मात्र नगरपंचायतने यापूर्वी स्वतः ची वाहने घेतली होती ती दुरुस्ती न करता हा तोट्याचा करार करून मुरबाड नगरपंचायतची लूट चलवल्याचा आरोपही आता करण्यात येत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *