निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या 19 व्या गळीत हंगामास सुरुवात 

706
            नीरा नरसिंहपूर,इंदापूर : (प्रतिनिधी,बाळासाहेब सुतार) – शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या 19 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ आज शनिवारी (दि.23) इंदापूर बाजार समितीचे सभापती व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
           कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याने  18 गळीत हंगाम यशस्वीपणे पुर्ण केले असून कारखाना प्रगतिपथावर आहे.मात्र चालू गळीत हंगाम ऊस टंचाईच्या पार्श्वभूमीवर चालू होत आहे.त्यामुळे उसाचे जास्तीत जास्त गाळप होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन अप्पासाहेब जगदाळे यांनी केले.
            कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी चालू गळीत हंगामातही नीरा भीमा कारखाना हा ऊस दरात इतर कारखान्यांच्या तुलनेत आघाडीवरच राहील अशी ग्वाही भाषणात दिली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *