मुरबाड नगरपंचायत करणार पार्किंगची व्यवस्था,फुटपाथ घेणार मोकळा श्वास   

505
      मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड नगरपंचायतने तीन हात नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरातील अनधिकृत गाळ्यासमोरील अतिक्रमण हटवून या परिसरात चालणाऱ्या पादचारी ,फेरीवाले व दुचाकी वाहन यांची पार्किंग व्यवस्था करण्यासाठी आज व्यापारी ,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांना बोलावून या नियोजन बैठक घेऊन पादचारी, फेरीवाले व दुचाकी वाहने पार्किंग  ची व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
     मुरबाड शहरातील तीन हात नाका ते  छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत गाळे आहेत त्या समोर असणाऱ्या फुटपाथ वर याच अनधिकृत गाळे धारकांचे अतिक्रमण व या पुढे रस्त्यावर च फेरीवाले तसेच  रस्त्याच्या मधोमध लावलेले धोकादायक पोल  हटवण्याची मागणी मनसे ने लावून धरली होती.  या मागणीला ही यश आले असून नगरपंचायत हे धोकादायक पोल रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावणार असल्याचे ही बैठकीत ठरले मात्र नगरपंचायत ने यापूर्वी अनेकवेळा  फुटपाथवर वरील  अतिक्रमणावर कारवाई केली, अवैध पार्किंग वर दंडात्मक कारवाई केली मात्र सातत्त्य  नसल्याने व चुकीच्या पद्धतीने कारवाई होत असल्याने नगरपंचायतला माघार घ्यावी लागली.  आता मात्र नगरपंचायत ने ठोस पावले उचलत धडक कारवाई करणार असे सांगत रस्त्याच्या दुतर्फा सम विषम दिवस दुचाकी पार्किंग साठी व्यवस्था,धोकादायक पोल हटविणे ,फुटपाथ मोकळे करणे , फेरीवाल्यांना जागा देणे  शहरात  येणाऱ्या  अवजड वाहनांसाठी निश्चित वेळ आखणे यासाठी ठोस पावले उचलली असल्याने याची अंमलबजावणी कधी होते या कडे नागरिकांचे लक्ष आहे.  या बैठकीत नगराध्यक्षा शीतल तोंडलीकर , मुख्याधिकारी परितोष कंकाळ,फेरीवाले संघटनेचे प्रतिनिधी रवींद्र चंदने, व्यापारी  तसेच नगरसेविका व नगरसेवक उपस्थित होते.नगरपंचायतच्या या निर्णयाचे स्वागत होत असून अनधिकृत बांधकामावर कधी कारवाई करणार असा सवाल नागरिक करत असताना तीन हात नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यन्तचे अनधिकृत गाळे वाचवण्यासाठी हे प्रयत्न असल्याचा आरोपही काही नागरिक करत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *