सादलगाव,पुणे : शिरूर तालुक्याच्या पूर्वभागातील गणपती माळ ,तांदळी, इनामगाव परिसरात भाद्रपदी बैलपोळा उत्साहात

967
           सादलगाव,पुणे :  शिरूर तालुक्याच्या पूर्वभागातील गणपती माळ ,तांदळी, इनामगाव,मांडवगण फराटा,वडगाव रासाई,बाभुळसर,गणेगाव दुमाला,म्हसोबावाडी,नांद्रेमळा,गारमाळ,शेलारवाडी,सादलगाव परिसरात आज भाद्रपदी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलपोळा सण हा शेतकऱयांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा सण होय. सकाळ पासूनच पूर्व भागात बैलांना अंघोळ घालून सजविण्याचे काम सूर असल्याचे पाहावयास मिळत होते. या बालगोपाळ तर मोठ्या उत्साहात सहभागी झाल्याचे दिसत होते.
गणपतीमाळ परिसरात बैल पोळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. अनेक शेतक-यांनी बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली होती. येथील सुप्रसिद्ध गणपती मंदिरासमोर बैलांची  दर्शनासाठी मोठी गर्दी पाहावयास मिळत होती. यंदा या भागात पावसाने तीव्र ओढा दिली असली तरी बळीराजाने बैलपोळा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला आहे. गणपती माळ येथे दरवर्षी बैल पोळा मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो परंतु कालानुरुप अनेक शेतकरी  आधुनिक पद्धतीने शेती करत असल्याने  बैलाची संख्या कमी झाली असल्याचे आज दिसत होते.
– प्रतिनिधी,पांडुरंग काळे,(सा.समाजशील,सादलगाव



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *