दोंडाईचा,धुळे : धुळ्यात भंगार बाजारातील दुकानांना भीषण आग, पाच ते सहा दुकानातील साहित्य आगीच्या भक्षस्थानी,अंदाजे २५ लाखांचे नुकसान

606
          दोंडाईचा,धुळे : धुळे शहरातील भंगार बाजारातील दुकानांना भीषण आग लागण्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे.या घटनेत येथील पाच ते सहा दुकानातील भंगार मालाचे साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले असून सुमारे अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
 घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल होत ही आग विझविण्याचा व आगीवर नियंत्रण मिळविण्याचा शर्थीचे प्रयत्न सुरु होता.ही आग कशाने लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही.
– प्रतिनिधी,समाधान ठाकरे,(सा.समाजशील,दोंडाईचा)    



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *