अण्णापूर,पुणे : पदवीधर संघटना ही शिक्षकांचे हित जपणारी संघटना. – माजी आमदार ऍड.अशोक पवार,विविध क्षेत्रातील गुणवंत संघटनेच्या स्वर्गीय धर्मराज कर्पे स्मृती पुरस्काराने सन्मानित

598
            अण्णापूर,पुणे :  अलिकडच्या काळात केवळ पदासांठी संघटना स्थापन होत असताना  संघटना प्रमुखाच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कार्याच्या स्मृती पुरस्कार रुपाने जतन करणारी  शिरुर तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना निश्चितच कौतुकास पात्र असुन शिक्षकांचे हित जपणारी  असल्याचे गौरवोदगार शिरुर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी काढले. शिरुर तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक  व केंद्रप्रमुख संघटनेच्यावतीने संघटनेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय धर्मराज कर्पे गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंताना स्वर्गीय धर्मराज कर्पे स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाच्या तिसऱ्या वर्षाच्या पुरस्कारांचे वितरण तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर ) येथील शिक्षक भवनमध्ये पार पडले. या सोहळ्यात माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पदवीधर संघटनेचे राज्याचे अध्यक्ष दत्तात्रय सावंत , पंचायत समितीचे सभापती विश्वासआबा कोहकडे , केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर यांनीही आपली मनोगते व्यक्त  केली. याप्रसंगी शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे , संघटनेचे विभागीय अध्यक्ष  सोपानआबा धुमाळ ,  सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष भरत संकपाळ , शिरुर तालुका शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष सतिश नागवडे , पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस नामदेव गायकवाड, जिल्हा कोषाध्यक्ष संजय , तर्डोबावाडीच्या सरपंच धनश्नीताई मोरे , दरेकरवाडीच्या सरपंच  दरेकर  , गुनाटच्या सरपंच दिप्तीताई करपे , माजी सरपंच, गहिनीनाथ डोंगरे, कोंढापुरी शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  एस.एस. गायकवाड , खुशालराव मोरे, गंगाराम साकोरे, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सतिश पाचर्णे , शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब आसवले , शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष अविनाश चव्हाण, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संध्या धुमाळ,  निलेश गायकवाड , पत्रकार रवि पाटील , नागनाथ शिंगाडे यांच्यासह  संघटनेचे तालुका व जिल्ह्याचे पदाधिकारी , शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.                        दरम्यान पदवीधर संघटनेच्या तालुका कार्याध्यक्षपदी नव्याने निवड झालेले नरहरी नरवडे व संघटनेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शन करणारे अविनाश कुंभार व पांडुरंग पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुका अध्यक्ष शहाजी पवार, सुत्रसंचालन माजी सरचिटणीस ज्ञानेश पवार यांनी केले तर सर्वांचे आभार जिल्हा अध्यक्ष अनिल पलांडे यांनी मानले. या सोहळ्यासाठी संघटनेचे सरचिटणीस सुरेश खैरे, कार्याध्यक्ष प्रदिप थोरात, नरहरी नरवडे, प्रदिप गव्हाणे निलेश गायकवाड , उमेश धुमाळ, अशोक कर्डीले , सुर्यकांत टाकळकर, शांताराम पोकळे, संजय तळोले यांनी विशेष परिश्रम घेतले.
तिस-या स्वर्गीय धर्मराज कर्पे स्मृती पुरस्काराने सन्मानित  गुणवंत  
 आदर्श शाळा – (गट इ.१ली ते ४थी ) – जि.प.प्राथमिक शाळा जांभळीमळा. (गट इ.१ली ते ७वी )- जि.प.प्राथमिक शाळा दरेकरवाडी.           जीवन गौरव पुरस्कार – दत्तात्रय विष्णू शिंदे (केंद्रप्रमुख टाकळीहाजी )
आदर्श शिक्षक पुरस्कार – संतोष पांडुरंग वेताळ ( जि.प.शाळा.कांडगेवस्ती , न्हावरे ), मोहन पोपट आनोसे (जि.प.शाळा शिंदेवस्ती, रांजणगाव सांडस ),चंद्रसेना विश्वनाथ शेळके (जि.प.शाळा हिवरेकुंभार ), प्रमिला बाळासाहेब इचके ( जि.प.शाळा कवठे येमाई ),साधना अरुण खोमणे, (जि.प.शाळा साबळेवाडी , टाकळीहाजी )
अध्यात्मिक क्षेत्र पुरस्कार  – ह.भ.प.विलास महाराज भोंगळे
आदर्श कार्यकता पुरस्कार – गुलाबराव दगडु तळोले (जि.प.शाळा खैरेवाडी ), जगन्नाथ बापुराव कदम (जि.प.शाळा सादलगाव  ) , वासंती रविंद्र साखरे (जि.प.शाळा कोरेगाव भिमा )
साहित्यरत्न पुरस्कार – मधुकर रावजी गिलबिले,पत्रकारिता पुरस्कार  – नागनाथ शिंगाडे, क्रीडा पुरस्कार  – अवधुत गोविंद कदम ( राज्यस्तरीय खेळाडू )  गुणवंत विद्यार्थी पुरस्कार  -सृष्टी संतोष गायकवाड (इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा राज्यगुणवत्ता यादीत स्थान ), रेणुका धनाजी धुमाळ, वैष्णवी धनाजी धुमाळ (इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा राज्यगुणवत्ता यादीत स्थान
विशेष पुरस्कार – जि.प.प्राथमिक शाळा कोंढापूरी (अध्यक्ष चषक प्राप्त शाळा ), राजेंद्र दत्तात्रय टिळेकर ( जिल्हा गुणवंत केंद्रप्रमुख ), एकनाथ पाराजी खैरे ,  विलास बबन पुंडे , आरती शामराव साळुंके ( जिल्हा गुणवंत शिक्षक)
तिळ्यांचा शिष्यवृत्तीत पराक्रम 
         पदवीधर शिक्षक संघटनेच्या स्व.धर्मराज कर्पे स्मृती पुरस्कारांच्या मानक-यात शिक्रापूर येथील रेणुका, वैष्णवी व सार्थक या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश होता. मुळचे शिक्रापूर (ता.शिरुर ) येथील रहिवाशी व सध्या कुडे (ता,खेड ) येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक असणारे धनाजी धुमाळ व कडुस (ता.खेड )येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका संगीता धुमाळ यांची ही तिन्ही मुले. गेल्यावर्षीच्या माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत रेणुका हिने 270  गुण, वैष्णवी हिने 264 गुण मिळवित राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असुन सार्थक 236 गुणांसह जिल्हा गुणवत्ता यादीत झळकला आहे. या तिघांनी इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. येथेच न थांबता यावर्षीच्या एमटीएस  परीक्षेत सुद्धा ते गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यामुळे  माजी आमदार व उपस्थित मान्यवरांनी या तिळ्यांचे विशेष कौतुक केले. एकाच कुटूंबातील व तेही तिळे असणाऱ्या मुलांनी मिळविले हे यश निश्चितच दुर्मिळ असुन कौतुकास्पद असेच आहे. 
 
– प्रतिनिधी,ज्ञानेश पवार,(सा.समाजशील,अण्णापूर



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *