शिक्रापूर,पुणे : विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले.

1094
           शिक्रापूर,पुणे :  विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले.कासारी (ता. शिरूर) येथे समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ.हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन खासदार दानवे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे होते. या कार्यक्रमास धारीवाल फाऊंडेशनच्या अध्यक्षा शोभा धारीवाल, आमदार बाळा भेगडे, भाजपाचे प्रदेश सदस्य शिवाजीराव भुजबळ, डॉ. राजेंद्र ढमढेरे, रोहिदास उंदरे, उद्योजक राजेश लांडे, विक्रम पाचूनदकर, माजी सरपंच अशोक गायकवाड, सरपंच संभाजी भुजबळ, गुलाब सातपुते, गोपाळराव गायकवाड, हिराबाई गायकवाड, पुणे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब चव्हाण, राजेंद्र भुजबळ, दादासाहेब सातव, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान शेळके, रोहित खैरे, संभाजी गवारे, रोहन ढमढेरे, प्राचार्य अशोक सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
          यावेळी बोलताना खासदार दानवे यांनी सांगितले की,  माजी विद्यार्थी हे शाळेच्या विकासात महत्वपुर्ण भूमिका बजावत असतात. येथील उच्च माध्यमिक विद्यालयास अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना धारिवाल फौंडेशनच्या माध्यमातून मदत केली जाईल असे यावेळी बोलताना शोभा धारिवाल यांनी सांगितले तर आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सीएसआर फंडातून विद्यालयात सुसज्ज स्वच्छतागृह व शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ. मशीन बसवून देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र ढमढेरे यांनी केले. प्रा. शितल धेंडे व प्रा. जगन्नाथ आल्हाट यांनी सूत्रसंचालन केले.अनिल नवले यांनी स्वागत केले तर तबन भुजबळ यांनी आभार मानले.
– प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *