ठाणे जिल्हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न,पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ठ कार्याबद्दल सा.समाजशीलचे जयदीप अढ़ाईगे यांचा गौरव 

542
        मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – महाराष्ट्र राज्य मराठी मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्हा शाखेची वार्षिक साधारण सभा आज संविधान दिनाचे औचित्य साधून कांदळी शहापूर येथे  संपन्न झाली.
    भारतीय संविधान दिना निमित्ताने या सभेत संविधानाचे प्रास्तविक वाचून संविधाना मुळे आपल्या जीवनात अनेक बाबी सुलभ झाल्या. संविधाना मुळे पत्रकार समाजात चौथा स्तंभ म्हणून उदयास आला असा संदेश देण्यात आला. तर २६/ ११ रोजी झालेल्या मुबंई वरील दहशतवादी भ्याड हल्ल्यात शाहिद झालेल्या शाहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली . तर पत्रकारिता क्षेत्रात पत्रकारिता कशी असावी याचे सर्वोत्तम उदाहरण असलेले अग्रेलेखाचा बादशहा असलेले दैनिक नवाकाळचे सर्वेसर्वा दिवंगत नीलकंठ खाडिलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
        यावेळी उत्तम सामाजिक विषयावर लिखाण करणारे, समाजातील विविध समस्याना नवाकाळ व सा. समाजशील व समाजशील न्यूजच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे प्रभावीपणे कार्य करणारे मुरबाडचे पत्रकार जयदीप अढाईगे,कवी मिलिंद जाधव,साम टीव्ही चे फैयाज शेख यांना गौरविण्यात आले. यावेळी संघटने चे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे,सल्लागार प्रकाश नीळ, नरेश पाटील, शंकर करडे आदी सह मुरबाड,भिवंडी, शहापूर कल्याण या तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *