विधानसभेत मुरबाडचा आमदार पहिल्यांदाच विरोधी पक्षाचा,मंत्री पदाला हुलकावणी 

878
        मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – राज्याच्या सत्तासंघर्षात भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेअजित पवार यांच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ विधी नंतर मुरबाड मध्ये जल्लोष करण्यात आला.  भाजपचे सरकार आले म्हणून राज्यात मोठया मताधिक्याने निवडून आलेले विद्यमान आमदार किसन कथोरे हे मंत्रिमंडळातील प्रमुख दावेदार असल्याने मुरबाड विधानसभेत दिवंगत माजी महसूलमंत्री शांताराम घोलप याच्या नंतर किसन कथोरे हे कॅबिनेट मंत्री बनणार हा विश्वास व्यक्त होत असतानाच तीन दिवसांच्या सरकारने मुरबाड विधानसभेच्या अपेक्षेला तिलांजली देत मंत्री पदाला हुलकावणी देत या विधानसभेला मुरबाडला पहिल्यांदा सरकार विरोधी आमदार म्हणून बसण्याची वेळ आणली .
         विद्यमान आमदार किसन कथोरे याना विकासपुरुष म्हणून मुरबाड मतदार संघात बोलले जाते.  त्यांनी माळशेज घाटात पर्यटन,काचेचा जगातील सर्वात मोठा पूल,राष्ट्रीय महामार्ग ६१ चे  चौपदरीकरण अश्या महत्वकांक्षी प्रकल्पाना पुढे आणले.  मात्र आज पर्यंत सत्तेत असल्याने मुरबाड विधानसभा क्षेत्रात विकासासाठी लागणार हवा तेवढा निधी आणण्यात यशस्वी ठरलेले आमदार आता पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या बाकावर बसणार असल्याने मुरबाड च्या विकासाला खीळ बसते की, विरोधी पक्षात बसूनही मोठा निधी मतदारसंघात आणतात या कडे आता मतदारांचे लक्ष लागले आहे .या सत्ता संघर्षात मात्र पहिल्यांदाच  मुरबाडच्या शिवसैनिक आता भाजप विरोधात अशी परिस्थिती असून खांद्याला खांदा लावून प्रचार करणारे भाजप व शिवसेना कार्यकर्त्याना महायुती चा उमेदवार विजयी करूनही विभक्त व्हावे लागले हा राजकारणाचा भाग झाला. मात्र शिवसेना आता महायुती तुन महाविकास आघाडीत असल्याने मुरबाड मतदार संघात शिवसेनेत प्रवेश केलेले सुभाष पवार व आमदार एकनाथ शिंदे यांच्या मुरबाड चा विकास कसा होतो याची ही चर्चा सुरू झाली आहे. तर मुरबाड ला मंत्रीपदाला हुलकावणी देत प्रथमच विरोधीपक्षाच्या बाकावर बसण्याची वेळ आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *