आमदार पदाची शपथविधी होताच कथोरे यांची संभाव्य पाणी टंचाई बैठकीला उपस्थिती, टंचाई कमी करणाऱ्या सरपंच,ग्रामसेवकांचा केला जाहीर सत्कार 

460

  मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – विकासपुरुष म्हणून गणना होत असलेले  व आपल्या कामातून गेल्या अनेक वर्षांपासून मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे मुरबाड विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय व कार्यकुशल आमदार किसन कथोरे यांनी आमदारकीची चौथ्यांदा शपथ घेतली आणि शपथविधी झाल्यानंतर मुरबाड तहसिलदारांनी आयोजित  केलेल्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीत उपस्थित राहून आपल्या कामाचा शुभारंभ केला.

          सदर बैठकीला तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर, तालुका कृषी अधिकारी  विश्वे, त्याचबरोबर ग्रामीण पाणीपुरवठ्याचे . खादरी,  जिल्हा परिषद सदस्य   सुभाष घरत, उल्हास बांगर पंचायत समितीचे  सभापती  दत्तु वाघ,इतर पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. मात्र ही सभा अधिकारी , कर्मचारी वर्गाची असल्याने पत्रकारांना  तहसीलदार अमोल  कदम यांनी  न बोलावल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त करत विकास नियोजनात पत्रकारांना  विश्वासात घेतले पाहिजे असं मत व्यक्त केले.
          याप्रसंगी टंचाई कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करत असलेल्या मोहघर,दहिगाव चाफे, आसोळे,पेंढरी,कळंभाड (भो) .या पाच ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांचा आमदार साहेबांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
 तब्बल अडीच तास नवनिर्वाचित आमदार महोदयांनी प्रत्येक गाव निहाय पाणीपुरवठ्याच्या योजनांचा आढावा घेऊन  संबंधित शासकीय यंत्रणांना टंचाई कृती आराखडा बनवण्याबाबत मौलिक सूचना केल्या. तसेच पुढील आठवड्यापासून टंचाई निवारणार्थ ज्या गावांमध्ये टंचाई जाणवते अशा गावांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन लोकांची मते जाणून घेऊन मगच योजनेवर काम करण्यात येईल असे आमदार कथोरे यांनी सांगितले.त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे बाधित शेत पिकांच्या नुकसानभरपाईचा ही आढावा या बैठकीत  घेण्यात आला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत या वेळी मार्गदर्शन करण्यात आले.
          गटविकास अधिकारी  केळकर यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की,ज्याप्रमाणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी भरीव योगदान दिले, त्याप्रमाणे आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड विधानसभा क्षेत्रातील महिलांच्या आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हिमोग्लोबिन कमी असलेल्या मुरबाड तालुक्यातील जवळपास १,२५,००० स्त्रियांचे आरोग्य तपासणीची मोहीम पुन्हा सुरू करून महिलांच्या विविध आजारांवर आरोग्य शिबिरे आयोजित करणार असल्याबाबतची माहिती त्यांनी दिली. तर मुरबाड विधानसभेत पहिल्यांदा विरोधी पक्षाचे आमदार असल्याने विरोधातील आमदार न पाहिलेल्या मुरबाड कराना सत्ताधारी  किती सहकार्य करतात व विरोधी बाकावर बसून किती निधी मुरबाड करासाठी आणतात या वर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *