दोंडाईचात उपजिल्हा रुग्णालयातर्फे जागतिक एड्स दिवस साजरा

899
          दोंडाईचा,धुळे : (प्रतिनिधी, समाधान ठाकरे) – आज जागतिक एड्स दिनी एड्स बद्दल डॉ. ललितकुमार चंद्रे यांनी थोडक्यात पण अत्यंत महत्वाची माहिती दिली. एड्स ची लक्षणे सांगताना, ताप, कोरडा खोकला, घसा दुखणे, गिळताना त्रास, वजन कमी होणे, रात्री घाम येणे, बद्धकोष्टी, अंगावर लाल रंगाची पुरळ, वारंवार तोंड येणे व तोंडात पांढरे चट्टे येणे. एच आय व्ही तपासणी ही, एच आय व्ही बाधित व्यक्तीशी असुरक्षित शारीरिक संबंध झाल्यावर, क्षय रोग, दूषित सुई किंवा सिरिंज वापर रक्त किंवा रक्त घटक यांचे संक्रमण गरोदरपनात, रक्त संबंधातील नातेवाईक एच आय व्ही बाधित असल्यास उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथे, आय सी टी सी विभागात, मोफत समुपदेशन, मोफत तपासणी, मोफत ऐआरटी औषधे तसेच  गरजेप्रमाणे संदर्भ सेवा पुरवली जाते. तसेच रुग्णाची माहिती, पूर्णपणे, “गोपनीय” ठेवली जाते. डॉ. ललितकुमार चंद्रे यांनी  या वर्षाचे ब्रीद वाक्य, “आपण बदल घडवू शकतो “असे सांगितले. एच आय व्ही व एड्स बद्दल संपूर्ण माहितीसाठी 1097 हा टोल फ्री क्रमांक व या संकेत स्थळावर देखील  संपर्क करावा. डॉ. चंद्रे यांनी सर्वांना आपल्या आरोग्याचे जतन करण्याचे, विनम्र आवाहन केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *