दोंडाईचात बजाज फायनान्सच्या फेस्टीवलच्या उद्घाटनाचा मान मतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना 

378
           दोंडाईचा,धुळे : (प्रतिनिधी, समाधान ठाकरे) – बजाज फायनान्स शाखा दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमानाने तीन दिवसीय फेस्टीवलचे दि. ३० रोजी उदघाटन समारंभाचे आयोजन केले होते. ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा मान स्व. खंडु पाटील निवासी मतिमंद विद्यालयातील मुला-मुलीना  देण्यात आला होता. त्यांच्या शुभ हस्ते फेस्टीवलचे उद्धघाटन व प्रतिमा पुजन दिप प्रज्वलन करण्यात आले.
         यावेळी स्व. खंडू पाटील मतीमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक गजेंद्र कानडे, शिक्षक कीशोर पाटील, रमेश पाटील, सुनिल पवार, हिंम्मत रोकडे या सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. बजाज फायनान्स शाखा दोंडाईचा सर्व कर्मचारी वृंद यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला व मुलांना टूथ पेस्ट व ब्रश भेट देण्यात आले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *