माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची गणेशवाडी येथे हरीनाम सप्ताहास भेट 

1095
       नीरा नरसिहपूर,इंदापूर : (प्रतिनिधी,बाळासाहेब सुतार) – इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी येथे  गुरुवार (दि.28 ) पासून अखंड हरीनाम सप्ताहाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. गणेशवाडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरा समोर हा सप्ताह सुरु आहे.शुक्रवारी (दि.29) रात्री राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सप्ताहास भेट दिली.यावेळी त्यांनी मंदिरास रुपये एक लाखाची देणगी दिली.त्यानंतर हर्षवर्धन पाटील हे काही वेळ कीर्तनासही उपस्थित होते.यावेळी ह.भ.प.कान्होबा महाराज देहूकर,राजवर्धन पाटील,उदयसिंह पाटील,मयूरसिंह पाटील,सरपंच किरण पाटील,मनोज पाटील,अमरसिंह पाटील  आदी मान्यवर उपस्थित होते.
        सप्ताहामध्ये दररोज पहाटे काकडा, हरीपाठ, ज्ञानेश्वरी पठन, किर्तन, प्रवचन,भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.गुरुवारी ह.भ.प.दत्तात्रय क्षीरसागर व राम शेळके गार अकोले यांचे प्रवचन आणि बापूसाहेब महाराज देहूकर यांचे कीर्तन झाले.तर शुक्रवारी ह.भ.प.लक्ष्मण आसबे बावडा व मामा काजळे टणू यांचे प्रवचन आणि केशव महाराज नामदास यांचे कीर्तन झाले.या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवार( दि.5)रोजी सकाळी ह.भ.प.कान्होबा महाराज देहूकर यांच्या काल्याचे किर्तनाने होणार आहे.सध्या या सप्ताहास भाविक दररोज मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *