कारूंडे रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डागडुजी सुरु

439

   नातेपुते,सोलापूर : (प्रतिनिधी,हनुमंत माने) – नातेपुते पश्चिम भागातील कारूंडे बंगला ,कारूंडे ते कोथळे रस्त्याची दुर्दशा झाली होती. पावसामुळे रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले होते. नागरिक व वाहन धारकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले होते. दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. सध्या कारूंडे ते कोथळे रस्त्यावर विविध समस्या निर्माण झाल्या होत्या. याची खबरदारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कारुंडे बंगला ,कारुंडे ते कोथळे येथील दहा किलोमीटर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांचेकडून खड्डे बुजविण्याचे काम चालू केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

या रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरु करण्यात आल्याने  शालेय विद्यार्थ्यांना सायकल वरील प्रवास आता बर्यापैकी सुरळीत झाला आहे. विशेषतः शालेय मुलांकडून या कामाचे कौतुक केले जात आहे. रस्ता दुरुस्ती मुळे कारुंडे येथून दहिवडी शिंगणापूर कडे जाणारी वाहने जवळचा मार्ग असल्याने पुन्हा या मार्गाचा वापर करताना दिसून येत आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *