तळेघर येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न 

416
घोडेगाव, ता.आंबेगाव (-प्रतिनिधी,सीताराम काळे) : अटलबिहारी वाजपेयी विचार मंच व मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन यांचे मार्फत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर तळेघर (ता. आंबेगाव) येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ११० रूग्णांची तपासणी केली. तर ३५ रूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी सांगितले.
 कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं, गरजेचं आहे. आपलं गावं हेच आपलं कुटुंब, आपलं घर आहे. याप्रमाणे शासकीय नियमांचे पालन करत नागरिकांनी काळजी घ्यावी. तालुक्यातील नागरिकांची जबाबदारी आंम्ही घेतली असून मोफत व सवलतीत सर्व ऑपरेशन केले जातील, असे भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी यावेळी सांगितले.  तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथे शासकीय नियमाचे पालन करत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख भाजप जयशिंग एरंडे, तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, कैलास राजगुरव, मारूती भवारी, संदिप बाणखेले, सुशांत थोरात, अशोक गभाले, किसन पारधी, आनंद डामसे, सरपंच चंद्रकांत उगले, काळु बाळु लोहकरे, रमेश शेळके, अमोल दाते, हेमंत चिखले, सुरेश अभंग आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ. रविंद्र कानडे, निलेश साबळे यांनी मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *