शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे – टाकळी हाजी गटात शिरूर आंबेगाव चे विकास पुरुष समजले जाणारे राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांना येणाऱ्या निवडणुकीत गटातुन अधिकाधिक मतदान कसे होईल यासाठी सर्वांना सोबत घेत कसून प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) चे या गटाचे अध्यक्ष युवानेते राजेंद्र सांडभोर यांनी केले आहे.
ना.दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून मागील पंधरा वर्षात कवठे – टाकळी हाजी गटात झालेली कोट्यवधी रुपयांची विकास कामे गटातील गावागावात जाऊन प्रत्यक्ष भेटून सांगणार असून जनतेने ही कोणाच्या ही भूल थापांना बळी न पडता सद्विवेक बुद्धीने विकासकामे करणाऱ्या ना.वळसे पाटील यांच्या पाठीशी भक्कम उभे राहावे असे आवाहन ही राजेंद्र सांडभोर यांनी केले आहे. ना.वळसे साहेबांची या भागात झालेली कोट्यावधी रुपयांची विकास कामे याची आठवण ठेवत आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत कवठे – टाकळी हाजी,बेट भागासह या गटातील सुज्ञ जनता,मतदार नक्कीच ना.दिलीपराव वळसे पाटील यांच्या पाठीशीच ठाम राहणार असल्याचे राजेंद्र सांडभोर यांनी सांगितले.लोकसभेला अनेकांकडून जी चूक करण्यात आली ती विधानसभेला नक्कीच होणार नाही असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे.
राजकारणातील प्रदीर्घ अनुभव व राज्याच्या राजकारणातील पहिल्या फळीत ना.वळसे पाटील यांचे भक्कम व अग्रणी स्थान असून त्यांच्यासारखे एक अभ्यासू, कुशल नेतृत्व संयमी नेतृत्व आम्हाला लाभले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या माध्यमातून शिरूरच्या कवठे -टाकळी गट भागात रस्ते,पाणी,वीज,विविध विकासात्मक योजना,आधुनिक शैक्षणिक वास्तू,सभागृहे,तरुणांसाठी व्यायाम शाळा उभ्या राहिल्या आहेत. ना.वळसे पाटील हे दूरदृष्टी असणारे नेतृत्व असून एकेकाळी सतत दुष्काळी समजला जाणारा आपला भाग केवळ आणि केवळ ना.वळसे पाटील साहेबांच्या अथक प्रयत्नातून सुजलाम सुफलाम झाला आहे. घोड नदीवर झालेले बंधारे त्यातून शेतीसाठी बारमाही मिळणारे पाणी यामुळे जिरायती शेती बागायती होऊन या भागातील शेतकऱ्यांचे सर्वांगीण जीवनमान उंचावले आहे.दळणवळण अधिक सुखकर व्हावे म्हणून घोड नदीवर बांधण्यात आलेले भक्कम पूल,कवठे गावचे ग्रामदैवत,तथा राज्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री येमाई मंदिरास मिळालेला तीर्थ क्षेत्राचा दर्जा,भाविकांची देवीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेत ना. वळसे साहेबांच्या माध्यमातून दुपदरी रस्त्यास मिळालेली मान्यता या व अशा अनेक समाज हिताच्या योजना ना.वळसे पाटील यांनी गटात राबविल्या आहेत.त्यामुळे जनता ना.दिलीपराव वळसे पाटील यांच्या च पाठीशी ठाम उभी राहणार असल्याचे सांडभोर म्हणाले. तर ना.वळसे साहेबांना या गटातून लीड मिळावे म्हणून कार्यकर्ते आता अधिक जोमाने कार्य करणार असल्याचे ते म्हणाले.