अजित दादांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा

393

पातूर, अकोला (-प्रतिनिधी,श्रीधर लाड) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जेष्ट नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे वतीने आ.अमोल  मिटकरी व नगरअध्यक्ष विजयभाऊ देशमुख यांच्या उपस्थितित विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर शहरामध्ये  सामाजिक उपक्रमांची रेलचेल होती. यामध्ये सर्वप्रथम पक्ष कार्यालय येथे केक कापण्यात आला व अजी दादा पवार यांचा दीर्घायुष्यासाठी पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ येथिल शिवमंदिरात जलाभिषेक, अशोक वाटिका येथे बुद्ध वंदना, गाडगे नगर येथे भजनी महिला मंडल यांना साड्या वाटप, जुने शहर येथे मदरसा मधील मुलांकडून व धर्म गुरू तसेच जुने शहर येथील दिवान शाह दाता दर्गा येथे प्रार्थना, सूर्योदय बालगृह खडकी वृद्धाश्रम येथे कपड़े वाटप, अश्याप्रकारे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांनी अनेक जण भारावून गेले होते. यावेळी राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ संतोष दादा कोरपे, प्रदेश संघटन सचिव कृष्णा अंधारे, प्रदेश संघटक मोहम्मद रफीक सिद्दीकी ,सैय्यद युसूफ आली, माजी गटनेता मनोज गायकवाड, नगरसेविका उषा ताई वीरक, नगर सेवक फैयाज खान, नितिन झापर्डे, अब्दुल रहीम पेंटर, माजी नगरसेविका  सुषमाताई निचल, माजी नगरसेवक, दिलीप देशमुख,संतोष डाबेराव, नकीर खान, अफसर कुरेशी, याकुब पहेलवान, मंदाताई देशमुख, सुधीर काहाकर, अशोक परलीकर, शालिनीताई येउतकर, भारतीताई नीम, देवानंद ताले, बुढन गाडेकर, अजय मते, अब्दुल अनिस, पापाचंद्र पवार, संदीप तायडे, अपुल राठोड, प्रमोद बनसोड, अज्जू कप्तान, आनंद वानखडे(पिंटू), प्रकाश सोनोने, राहुल इंगोले, शुभम सिरसाट, रवी गिते, विपुल माने, स्वप्नील थोरात, शुभम ढोले, शुभम पिठलोड, वसिम खान, मोहसिन शेख, अमित खांडेकर, सलीम गन्नेवाला, शौकत अली शौकत, के.सी. बागडे, मोहम्मद फिरोज, संज्योती मांगे, आदि सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *