अलिबाग,रायगड : मद्यधुदं पर्यटकांचा श्रीवर्धन पोलीस निरीक्षकावर हल्ला,पोलिस निरीक्षक सुरेश खेडेकर जखमी, बेधुंद पर्यटकांवर गुन्हा दाखल व पोलिसांकडून अटक

437
           अलिबाग,रायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन बिचवर मद्यधुदं पर्यटक ज्यामध्ये आठ पुरुष व तीन महीलांनी बिचवर धिंगाणा घालत बियर च्या बाटल्या फोडल्या, तर त्यांना ताकिद द्यायला गेलेले पोलीस निरिक्षकासह अन्य एका पोलीस कर्मचा-यांवर हल्ला केला.  पण या बेधुंद पर्यटकांवर कारवाई साठी श्रीवर्धनकर एकवटल्याने पर्यटकांची चांगलीच नशा उतरली.
मागील २-३ दिवसांपासुन बिचवर काही पर्यटक असभ्य वर्तन करुन दारु पिऊन जोरजोरात ओरडत असल्याच्या तक्रारी श्रीवर्धन पोलीसांना आल्या होत्या. तसेच सदर पर्यटक ड्रोन कँमे-याच्या सहाय्याने बिचवर समुद्र किनारी चित्रिकरण करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्या अनुषंगाने स्वता पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर त्यांच्या गाडीचा चालक पोलीस नाईक ठोबंरे व दोन महीला पोलीस कर्मचारी घेवुन पोलीस निरीक्षक मगंळवारी रात्री ८ च्या सुमारास बिचवर गेले.
           दारु पिऊन धागंडधिंगा घालणा-या पर्यटकांना त्यांनी सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यास मनाई केली तसेच सुमुद्र किनारी परवानगी शिवाय ड्रोन कँमेराने शुटिंग करणे बेकायदेशीर असल्याचे सांगत शूटिंग  करण्यास रोखले.
           त्या गोष्टीचा राग येवुन यातील सर्व पर्यटकांनी धमकी देत पोलीस निरीक्षक खेडेकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली व आम्ही कोण आहेत तुम्हाला माहीत नाही आम्हाला रोखणारे तुम्ही कोण ? असे पोलीसांना धमकावतच त्या मद्यधुंद पर्यटकांनी पोलीस निरीक्षक यांना जबर मारहाण केली. तसेच त्यांच्या सोबत असलेला चालक ठोबंरे याला धक्काबुकी केली.या मारहाणीत पोलीस निरीक्षक सुरेश ज्ञानोबा खेडेकर यांच्या डाव्या खाद्यांला जबर दुखापत होवुन फ्रँक्चर झाला असल्याने त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
           या घटनेची खबर लागताच श्रीवर्धन कर एकवटले व त्यांनी सदर पर्यटकांवर कारवाई करण्याचा रेटा लावला त्यामुळे सदर बिगडैल पर्यटकांची नशाच उतरली. विशेष म्हणजे या पर्यटकांमध्ये ३ महीलांचा समावेश होता. श्रीमंतीचा बडेजाव आणणा-या या पर्यटकांवर कारवाई न होण्यासाठी श्रीवर्धन पोलीस स्टेशनला अनेक मात्तब्बर मान्यावरांचे फोन आल्याचे सुत्रांकडुन माहीती मिळाली आहे.
          अखेर या ठिकाणची परिस्थीती पाहून स्वता dysp पवार यांनी परिस्थीती हाताळुन ग्रामस्थांना शांत करीत अखेर अतुल कन्हैयालाल सुराना, सत्यम अतुल सुराना, शुभम कन्हैयालाल सुराना, वर्षा अतुल सुराना सर्व रा. प्लाँट नं. ९,  गंगाबाम २, मार्केट यार्ड, पुणे. प्रचिती रविद्रं सखलेजा, संगिता रविद्रं सखलेजा सर्व रा. औरगांबाद. अतुल शांतिलाल गोलेचा, वारजे पुणे. विष्णु रामनाथ गव्हाणे, नागेश मदन पोतदार.मयुर अरुण पोतदार, सर्व रा. कात्रज पुणे व हर्षल सुनिल मासोजी,पदमावती – पुणे यांच्यावर शिवीगाळ, मारहाण, असभ्य वर्तन व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सर्व पर्यटकांवर भादवि कलम ३५३, १४३, १४७, १४९, ३२३, ३४१, ५०४, तसेच मुबंई पोलीस अधिनियम १९५१ चे ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सर्व पर्यटकांना अटक करण्यात आली.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *