श्री गुरुदेव दत्त विद्यालयातील दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

984

पाबळ, ता.शिरूर (-प्रतिनिधी, अमिन मुलानी) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेच्या श्री गुरुदेव दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान शाखा) सविंदणे या विद्यालयातील इयत्ता आठवीतील दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत. १. वागदरे श्रेयस संतोष (२०४ गुण ) २. कंठाळी ऋतुजा नामदेव (१९६ गुण) मिळवून शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट झाले आहेत. अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक पुंडे एस. जे. यांनी दिली. यशस्वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सत्कार व कौतुक केले. तसेच मार्गदर्शक जेष्ठ शिक्षक महामुनी ए. व्ही, शिंदे व्ही. बी,लोखंडे एस. जी, कंठाळी एन. आर. व मोरे के. एस. यांचे मुख्याध्यापक व समस्त ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *