शासनाची सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांना वरदान – प्रा.सुभाष शेटे,प्रदेशाध्यक्ष,युवा क्रांती राष्ट्रीय किसान विकास मंच

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शासनाची सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांना आता वरदान ठरत असून सातत्याने भेडसावणाऱ्या विजेच्या समस्येवर शेतीला पाणी देण्यासाठी अनेक सौर कृषी पंप बसविलेल्या शेतकऱयांना ही योजना खूपच फायदेशीर व उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष,वरिष्ट पत्रकार प्रा. सुभाष शेटे यांनी सा.समाजशील शी बोलताना केले आहे.
        सरकारची मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरत आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेत आपल्या शेतीतील विहीर,बोअरवेल वर सौर कृषी पंप बसवून किमान दिवसभर शेतीला पाणी कसे देता येईल याची सोय केली आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई चे शेतकरी असलेले पत्रकार,समाजशील न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक देवकीनंदन शेटे यांनी देखील आपल्या शेतीतील विहिरीवर नुकताच सौर कृषी पंप बसविला असून वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे शेतातील पिकांना विहिरीत पाणी असून ही पाणी देणे त्यांना मुश्किल होत होते.अनेकदा दिवसा थ्री फेज वीज पुरवठा मिळत नाही.मिळाला च तर तोही कमी दाबाने अनेकदा तर वारंवार वीज पुरवठा ता तासनतास बंद राहत असतो. अशा वेळी शेतीला पाणी देणे अवघड होऊन बसते.आता शेतीत सौर कृषी पंप बसविल्याने ऐन उन्हाळ्यात वीज जरी उपलब्ध नसली तरी किमान सकाळी नऊ ते सायंकाळी सूर्यास्त होई पर्यंत शेतीला सौर कृषी पंपाद्वारे सुरळीत पाणी देता येणार असल्याचे पत्रकार शेटे यांनी सांगितले. आज या सौर कृषी पंपाच्या प्रारंभ प्रसंगी सेवा निवृत्त पोलीस अधिकारी वसंत बापू उघडे,कास्तळू शेतकरी आदिनाथ रोहिले उपस्थित होते.
    या योजनेत शेतातील विहीर,बोअरवेल वर सौर कृषी पंप बसविण्यासाठी ऑनलाईन अर्जाद्वारे संपूर्ण कागदपत्रांसह मागणी अर्ज केलेल्या शेतकऱयांना  सरकार ने गतिमानतेने सौर कृषी पंप बसून देत दिलासा देण्याची मागणी युवा क्रांती फाउंडेशन राष्ट्रीय किसान विकास मंच चे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुभाष शेटे व शेतकऱ्यांनी केली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *