सामाजिक कार्यकर्ते सुभाष जाधव यांचे उपोषण मागे 

733

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : जनसेवा शिक्षण मंडळ मुरबाड कडून कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी विवीध मागण्या घेतं सामाजिक कार्यकर्ते सुभाष जाधव यांनी दोन दिवसांपासुन उपोषण सुरू केले होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्या विवीध 23 मागण्या निवेदनात करण्यात आल्या होत्या. विना अनुदानित कर्मचाऱ्यांना पद निहाय सातव्या वेतन आयोगानुसार वेतन व भत्ते लागू करावे, रुजू दिनांका पासुन त्याचा फरक द्यावा, अनुकंपाच्या यादीतील पूर्तता त्वरित करावी, स्थानिकांना प्राधान्य द्यावे, प्राचार्य पद त्वरित भरावे, अश्या विवीध मागण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून उपोषण सुरू होते. मात्र ज्या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उपोषण करण्यात आले. त्यातली एकही कर्मचारी उपोषण स्थळी नसल्याने जाधव हे कुणासाठी लढत आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मुरबाड तहसीलदार कार्यालयाकडून वरीष्ठ पोलिस निरिक्षक यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडण्यात आले. त्यामुळें चौकशी समितीची स्थापना कधी होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर यावर काय करवाई होतें उपोषणाला कितपत यश मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *