BREAKING NEWS
Search

कवठे येमाईत भीषण अपघात दुचाकीवरील एक ठार, दुसरा गंभीर जखमी

3090
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील पश्चिमेकडील कवठे येमाई येथून गेलेल्या अष्टविनायक महामार्गावरील इचकेवाडी जवळ इको चारचाकी गाडी व दुचाकी गाडीची समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये भीषण अपघात होऊन दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर  जखमी झाला असून त्याच्या वर शिरूर येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत.
या बाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार काल बुधवारी ०५जून रोजी ७ वा. चे सुमारास कवठे येमाईतील इचकेवाडी येथील बस स्टॅन्ड जवळ पारगाव ते कवठे येमाई रोडवर दिपक येठेकर हा मोटार सायकल नं. एम. एच.१६ सी. आर. ७७८५ चालवित जेवणाचा डब्बा आणण्याकरता कामगार रंगनाथ बन्सी आढाव याच्यासह जात असताना कवठे येमाई बाजूकडून पारगाव बाजूकडे चुकीच्या बाजूने येणा-या इको चारचाकी गाडी नं. एम.एच.१२.टी.डी.८७१८ वरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील इको गाडी भरधाव वेगात चालवल्या त्यामध्ये एखाद्या अपघात होवून त्यामध्ये जिवीत हानी अगर मृत्यू होवू शकतो याची जाणीव असतानाही इको गाडीवरील चालकाने त्याचे ताब्यातील गाडी भरधाव वेगात, हयगयीने, निष्काळजीपणे, रहदारीचे नियम याकडे दुर्लक्ष करून चालवुन दुचाकीवरील दिपक येठेकर व त्याचे पाठीमागे बसलेला रंगनाथ बन्सी आढाव यांना समोरासमोर धडक दिली.झालेल्या या भीषण अपघातात दिपक येठेकर वय ३३ वर्षे रा. मु. पो. गुंडेगाव, ता. जि. अ. नगर याचा मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला रंगनाथ आढाव यांना किरकोळ व गंभीर जखमा  झाल्या आहेत. इको चारचाकी गाडी वरील अज्ञात चालकाविरूद्ध मयताचा भाऊ अमोल गोरक्ष येठेकर यांनी शिरूर पोलिसांत कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास शिरूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करत आहेत.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *