कवठे येमाई परिसरात वाढत्या डीपी,केबल चोऱ्या अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस,महावितरणची संयुक्त बैठक संपन्न – धडक कारवाई करण्याचा पोलीस निरीक्षक गुंजवटे यांचा इशारा

540

शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यंत मोठे गाव असलेल्या शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई व परिसरात सातत्याने होणाऱ्या विजेच्या डीपी चोऱ्या व परिसरात बोकाळलेले अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर आज येथील ग्रामपंचायतीच्या श्री येमाई माता सभागृहातदुपारी ३ ते साडेचार वाजेपर्यंत बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीस शिरूरचे पोलीस उपनिरीक्षक ज्योतीराम गुंजवटे,उपनिरीक्षक सुनील उगले,त्यांचे पोलीस सहकारी कर्मचारी,महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव,शाखा अभियंता इंगळे व त्यांचे कर्मचारी,निरगुडसरचे माजी सरपंच तथा राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून रामदास वळसे पाटील,कवठे येथील अनेक ग्रामपंचायत सद्स्य,ग्रामस्थ उपस्थित होते.

         कवठे येमाई परिसरात वाढत्या डीपी,केबल चोऱ्या अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस,महावितरण अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध प्रतिबंधात्मक उपाय योजनाआखण्यात आल्या असून गावोगावी ग्रामसुरक्षा दल तात्काळ सक्रिय करण्यात येणार आहेत. परीसरात चालू असलेल्या अवैध धंद्यांवर आता कडक व धडक कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक गुंजवटे यांनी ​सा.समाजशीलशी बोलताना सांगितले.बैठकीस उपस्थित असणारे रामदास वळसे पाटील यांनी कवठे येथील अवैध दारूधंद्यांबाबत ​एक्सईज विभागाचे पुणे विभाग अधिकारी रजपूत यांच्याशी थेट संपर्क साधत येथील वस्तुस्थितीची त्यांना माहीती दिली. तर पोलिस व महावितरण यांची संयुक्त पथके स्थापन करण्यात येत असून ग्रामसुरक्षा पथकाच्या मदतीने ट्रान्स्फार्मर चोऱ्या रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिरूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी​ सा.समाजशील शी बोलताना सांगितले.तर गाव व परिसरात जोरदार पणे सुरु असलेल्या अवैध धंद्यांबाबत उपस्थितांसमोर प्रश्नांची खैरात केली. यावर तात्काळ योग्य त्या उपाय योजना करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याने हि बैठक संपन्न झाली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *