“मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण” योजनेत शिरूर तालुक्यात महिलांचा उत्फुर्त सहभाग – आजपर्यंत १२४६० अर्ज दाखल – तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांची माहिती 

761
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक)  – महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग यांचेकडील दि.२८/६/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये दि.३/७/२०२४ रोजीच्या गुजरीत शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण” योजना लागू करणेत आलेली आहे. सदर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेच्या अंमलबजावणीचे अनुषंगाने शिरूर तालुक्यात अंतर्गत तहसिल कार्यालय शिरुर, पंचायत समिती कार्यालय शिरूर व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने गाव पातळीवर पात्र लाभार्थी महिला ऑफलाईन व ऑनलाईन फॉर्म भरून घेणेसाठी नाव निहाय आराखडा तयार करणेत आलेला असून त्या दृष्टीने आवश्यक नियोजन करणेत आलेले आहे.याप्रमाणे करणेत आलेल्या नियोजनानुसार तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका,संबंधित ई सेवा केंद्र, समूह संसाधन केंद्र यांचे मार्फत दि. ४/७/२०२४ पासून प्रत्यक्ष ऑफलाईन ऑनलाईन फॉर्म भरुन घेणेची कार्यवाही सुरु झालेली असून तालुक्यातील एकूण ९६ ग्रामपंचायत स्तरावर दि. २/७/२०२४ पासून दैनंदिन शिबिरांचे आयोजन करणेत आलेले आहे.  या योजनेची प्रभावी अंगलबजावणी सुरु आहे. सदर गावामध्ये आज अखेर एकूण १२४६० ऑफलाईन व ऑनलाईन फॉर्म भरून घेत आलेले आहेत. सदर फॉर्म भरून घेण्यात आल्याची माहिती शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
या योजनेत गावागावातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून केलेल्या नियोजनाबाबत ग्राम स्तरावर समाधान व्यक्त केले जात आहे.स्नेहा किसवे – देवकाते, उपविभागीय अधिकारी पुणे, बाळासाहेब म्हस्के, तहसिलदार शिरुर यांचे संपूर्ण कामकाजावर नियंत्रण असून त्यांचे मार्गदर्शनाखाली महेश डोके, गटविकास अधिकारी शिरुर, निर्मला चोभे, प्रकल्प अधिकारी एक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय शिरुर, वैशाली सटाले प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय शिरूर, संगिता बेंगाळ, सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास योजना कार्यालय शिरूर, ग्रामस्तरावरील अधिकारी/कर्मचारी देखील प्रभावीपणे काम करीत असल्याचे तहसिदार म्हस्के यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *