समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने मोरया लॉन्स रांजणगाव गणपती ता.शिरूर जि.पुणे आयोजित तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कुलच्या २ विद्यार्थिनी चमकल्या असून त्यांनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरी नंतर त्यांची जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा दि.२२ रोजी रांजणगाव गणपती येथे पार पडली.

या स्पर्धेमध्ये इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कवठे येमाई येथील कु.अनुष्का संतोष गोसावी ही ८ वी तील विद्यार्थिनी १४ वर्षे वयोगटात प्रथम तर कु.निकिता पंढरीनाथ बांगर इयत्ता १२ वी च्या विद्यार्थिनीने १९ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक मिळवला.तर टाकळी हाजी येथील बापूसाहेब गावडे विद्यालयाचे तनिशा शौकत मुजावर,श्रवन विनोद बोखारे यांची बारामती येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी स्पर्धकांना कराटे प्रशिक्षक अक्षय पवार यांनी उत्कृष्ठ प्रशिक्षण दिल्याने या तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत निर्विवाद यश संपादन करता आल्याचे अनुष्का गोसावी हिने सा.समाजशील शी बोलताना सांगितले.
जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत घवघवीत व नेत्रदीपक यश संपादित केलेल्या या चार ही विद्यार्थी व प्रशिक्षक अक्षय पवार यांचे माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील,शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्राचार्य किसनराव रत्नपारखी,युवा क्रांती फाऊन्डेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख,मार्गदर्शक, राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जेष्ठ पत्रकार प्रा. सुभाष अण्णा शेटे, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ.सुभाष पोकळे,अरुणाताई घोडे,डॉ.कल्पनाताई पोकळे,टाकळी हाजीचे माजी सरपंच दामुअण्णा घोडे,कवठे च्या सरपंच मनीषा पांडुरंग भोर,प्राचार्य जगदीश टिकले,बजरंग दल कवठे येमाई,गवळी मॅडम,कोतवाल सर,टाकळी हाजीचे कराटे प्रशिक्षक शौकत शेख,प्राचार्य एस वाघमारे व मान्यवर ग्रामस्थानी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.
तर कवठे येथील कराटे प्रशिक्षक अक्षय पवार अत्यंत जेमतेम परिस्थितीतून शिक्षण घेत कराटे,तायकोंदो,किक बॉक्सिंग या खेळात त्यांनी नैपुण्य मिळवले असून मुले व खास करून संकट आल्यास स्वसंरक्षणासाठी मुली या सामर्थ्यवान बनाव्यात म्हणून ते सध्या कवठे येथे ओम देशमुख,प्रगती पोकळे,आशुतोष पोकळे,ओंकार बांगर,यांच्यासह ३० विद्यार्थी विद्यार्थिनींना कराटे चे प्रशिक्षण देत आहेत.पालकांमधून ही प्रशिक्षक अक्षय पवार यांचे कौतुक केले जात आहे.