दोंडाईचा,धुळे : रखडलेली आहार सेवा, १६ वर्षा नंतर पुन्हा जोमात सुरू

662

दोंडाईचा,धुळे : उपजिल्हा रुग्णालयात येथे १ एप्रिल २०१९ पासून, आंतर रुग्णांसाठी व एका नातेवाईकासाठी मोफत आहार सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये  मोफत चहा, नाष्टा व दोन्ही वेळ पोटभर जेवण दिले जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. ललितकुमार चन्द्रे यांनी समाजशील शी बोलताना दिली. जवळपास १६ वर्ष ही सेवा प्रशासकीय व तांत्रिक अडचणींमुळे बंद झाली होती. ती पुन्हा कार्यान्वित झाल्याने डॉ.ललितकुमार चन्द्रे यांनी आनंद व्यक्त केला व प्रशासनाचे आभार मानले. त्यांनी या ठप्प झालेली सेवा पुन्हा सुरळीत होण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. दररोज एकूण १०० रुग्ण व नातेवाईक यांना मोफत आहार दिला जाईल. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालय येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.तसेच अनेक मान्यवरांनी येथे भेट दिली.या स्तुत्य उपक्रमाबद्दल डॉ. चन्द्रे यांचे विशेष कौतुक केले. मात्र याचे सर्व श्रेय डॉ.चंद्रे यांनी प्रशासनास दिले व उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा या वास्तूस परिपूर्ण करण्याचे मानस असल्याचे बोलून दाखवले. तसेच दोंडाईचा शहरातील तसेच परिसरातील सर्व नागरिकांना रुग्णालयात शांतता ठेवण्याचे व सहकार्य करण्याचे विनम्र आवाहन केले.

 

– प्रतिनिधी, समाधान ठाकरे (सा.समाजशील,दोंडाईचा, धुळे)




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *