शिक्रापूर,शिरूर : प्रतिमा पंलाडे स्कुलची उज्वल निकालाची परंपरा कायम,सलग सहा वर्षे १०० टक्के निकाल

345
         शिक्रापूर,शिरूर : तालुक्यातील शिक्रापूर येथील कस्तुरी शिक्षण संस्थेच्या प्रतिमा पंलाडे स्कुलने (आय सी  एस ई ) परिक्षेत १०० टक्के यश संपादित करीत यशाची परांपरा यावर्षी ही कायम राखली आहे. सलग ६ वर्षे या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून शाळेने उज्वल यशाची परांपरा कायम राखली आहे .या परीक्षेत ऐश्वर्या सातारकर ९६.०६ टक्के गुण मिळवत प्रथम आली असून ज्ञानेश्वरी पवार ९४ टक्के गुण मिळवत व्दितीय तर नियती काळे हिने ९१ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे. परीक्षेस बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी घावाघवावीत व नेत्रदीपक यश संपादित केले आहे. शाळेचे संस्थापक पंडीत पंलाडे,अध्यक्षा जयश्री पंलाडे,संचालक डाँ, प्रतिक पंलांडे,शाळेचे प्राचार्य डाँ. सोमेन चँटर्जी,बी.फाँर्मसीचे.डाँ संदिप क्षीरसागर,बी एड काँलेजचे प्राचार्य डाँ. सुनंदा सातारकर,कला वाणिज्य विद्यालयाचे प्राचार्य  डाँ.गणेश अय्यर,सर्व शिक्षक शिक्षकेतर पालक वर्गातुन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होतआहे.
 -प्रतिनिधी,राजाराम गायकवाड,(सा.समाजशील,शिक्रापूर



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *