राष्ट्रवादीचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे शिरूरमध्ये वर्चस्व कायम,टाकळी हाजीतुन डॉ. अमोल कोल्हेंना साडेतीन हजार मतांचे मताधिक्य

6450
             टाकळी हाजी,शिरूर : शिरुरचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान नेते पोपटराव गावडे यांच्या  टाकळी हाजी गावाने शिरुर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना शिरुर आंबेगाव विधानसभा मतदार संघातून  सर्वाधिक मताधिक्कय देवून विक्रम केला तर ३९ गावामधुन १६ हजार ६९४ मतांची मोठी आघाडी राष्ट्रवादी कॉग्रेसला मिळाली आहे.
टाकळी हाजी ग्रुपग्रामपंचायतीमध्ये आठ मतदान मतदानकेंद्रे होती. एकूण मतदान ६६३८ होते. तर  त्यापैकी ५०६२ इतके मतदान झाले आहे.यामध्ये डॉ.अमोल कोल्हे यांना ४१०४ मते पडली तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलीन यांना फक्त ७६७ मते पडली आहेत.यामध्ये डॉ. कोल्हे यांना एकट्या टाकळी हाजीने  ३३३७ मतांचे मताधिक्य दिले असून डॉ. कोल्हे यांना शिरुर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्कय देण्याचा विक्रम केला आहे. टाकळी हाजी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून गेली पन्नास वर्षापासून हा भाग राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना माननारा आहे. आजपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणूकांमध्ये या भागाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच मताधिक्य दिले आहे.
टाकळी हाजी जिल्हा परिषद गटामध्ये कोल्हे यांना ६६९० मतांचे मताधिक्य असून यामध्ये टाकळी हाजी गणाने ५६६३ मतांचे मताधिक्य दिले आहे.तर शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या कवठे येमाई गणातून डॉ.कोल्हे यांना चक्क  १०२७ मतांचे मताधिक्य दिले आहे.
त्याचप्रमाणे केदूंर पाबळ जिल्हा परिषद गटाने ५०४९ मतांचे मताधिक्कय कोल्हे यांना दिले आहे.केदूंर गणाने २४२४ मतांची तर पाबळ गणाने २६२५ मतांची आघाडी दिली आहे.तर रांजणगाव – कारेगाव जिल्हा परिषद गटाने ४९५५ मतांची कोल्हे यांना आघाडी दिली आहे.रांजणगाव गणात ३१२७ मतांची तर १८३८ मतांची कारेगाव गणामध्ये कोल्हे यांना आघाडी मिळाली असून शिरुर मधील ३९ गावांनी १६६९४ मतांची आघाडी कोल्हे यांना दिली असल्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अधिक मजबुत असल्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे.या गटात राष्ट्रवादीचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सक्षम व लोकाभिमुख नेतृत्व असुन, विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शिरूर मधील ३९ गावात मोठ्या प्रमाणात केलेल्या विकास कामाची पावती मतदारांनी या निवडणुकीत दिली आहे.
आत्तापर्यंत झालेल्या अनेक निवडणुकांत राष्ट्रवादी कॉग्रेसला या भागामधुन माजी आमदार पोपटराव गावडे यांनी एकतर्फी आघाडी देण्यांचे काम केले आहे. वयाची  ७५ पार केलेली असलेले गावडे कार्यकर्त्यांना स्फूर्ती मिळावी असे काम करीत असून सकाळ पासुन रात्री उशीरा पर्यंत ते विविध कार्यक्रमात सहभाग घेत जनसंपर्क राखून आहेत. सर्व सामान्यांच्या प्रश्नासाठी लढणारे नेते व कुठल्याही सामान्य माणसाला आपला प्रश्न त्यांच्या माध्यमातून नक्कीच सुटेल असा आशावाद गावडे यांच्या रूपाने शिरूर आंबेगाव तालुक्यात आहे.
शिरूर तालुक्यांचे दोन वेळा आमदार झालेले गावडे, मतदार संघ विभागणी नंतर आंबेगाव तालुक्याचे भक्कम नेतृत्व दिलीपराव वळसे पाटील यांच्या पाठीमागे भक्कम पणे उभे रहात आहेत. वळसे पाटील यांचे वडील सहकारमहर्षी दत्तात्रय वळसे पाटील व पोपटराव गावडे यांच्यामधील दोस्ती या दोन घरात तिसऱ्या पिढीत सुद्धा दिसत असल्याने राष्ट्रवादीचा हा गढ आज ही अभेद्य असल्याचे चित्र आज ही पाहावयास मिळत आहे.
– संजय बारहाते,विशेष प्रतिनिधी,(सा.समाजशील,टाकळी हाजी)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *