कान्हूर मेसाई,शिरूर : वळवाच्या पहिल्याच वादळी पावसात कान्हूर मेसाई येथील छावणीची दुर्दशा,शेतकऱ्यांना घरपोच चारा देण्यासाठी सरकारने दखल घ्यावी, शेतकऱ्यांची मागणी

745
      कान्हूर मेसाई,शिरूर : दुष्काळाने होरपळत असलेल्याने शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात काल दि.०७ ला मान्सूनपूर्व वादळी पाऊस झाला आहे. यात  कान्हुर मेसाई येथे वळवाच्या पावसा सोबत आलेल्या जोरदार वादळाने येथे उभारण्यात आलेल्या चारा छावन्यांची अत्यंत दुर्दशा झाली आहे.जनावरांच्या सुरक्षीततेसाठी जनावरे छावनीत न ठेवता ज्याच्या त्याच्या घरी नेवुन आहे तो चारा वाटप एक ते दिड महीने चालु ठेवन्यासाठी शासनस्तरावर व सर्वच पक्षाच्या नेतेमंडळींनी आवश्यक ती कार्यवाही करन्या संदर्भात प्रयत्न करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भास्कर पुंडे व छावणीत जनावरे आणलेल्या शेतकर्यांतून होत आहे. यद कदाचीत जोरदार वादळी पाऊस झाला व वीज कोसळली तर छावणीत उघड्यावर असणारी जनावरे व त्यासोबत असणाऱ्या शेतक-यांना त्यातून दगाफटका बसल्यास मोठीच हानी होऊ शकते. ही बाब लक्षात घेता तहसिलदारांनी  पंचनामा करून आमदार,खासदार,पालकमंत्री यांनी याबाबत जिल्हाधिका-यांशी तातडीने संपर्क करण्याकामी मदत करावी असे आवाहन शेतकऱयांनी केले आहे.  सध्या कान्हूर मेसाई येथील चारा छावणीत ८५० जनावरे दाखल आहेत.
 – सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *