कवी विजय जाधव नाशिकमधील ६ व्या राज्यस्तरीय फुलोरा कवी संमेलनात सन्मानित  

523
        मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – नाशिक मधील हाँटेल राँयल हेरिटेज येथे झालेल्या ६ वे राज्यस्तरीय फुलोरा कलेचे माहेरघर आयोजित हास्यकवी संमेलनात मुरबाडचे कवी विजय ज.जाधव यांनी सादर केलेल्या हास्य विडंबन कवितेसाठी फुलोरा परिवारातर्फे  सन्मानित करण्यात आल्याने  मुरबाड मधील रसिक वर्गातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.
        या वेळी संस्थापक अध्यक्ष सुनिल सातपुते ,कवी समेलन अध्यक्षा .श्रद्धा लुनिया ,उद्योगपती,समाजसेवक चंदनमल बाफना, कवी रज्जाक शेख आणि व्यासपीठावरील इतर मान्यवरांनी त्यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देवून सन्मानित केले. त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेल्या कवींनी आपल्या रचना सादर करुन कार्यक्रमाला रंगत आणली होती. या अगोदर कवी विजय ज.जाधव यांना न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्था पूणे यांच्या वतीने २०१८ ला “डाँ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य गौरव पुरस्कार” व शब्द अंतरीचे या प्रख्यात साहित्यिक समुहाकडून राज्यस्तरातून २०१९चा “कोहिनूर” हा विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *