शिवळे वडाचापाडा येथील कंपनी कामाला मुरबाड दिवाणी न्यायालयाचा मनाई हुकूम : शेतकऱ्यांना दिलासा  

648
         मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी :-जयदीप अढाईगे) – मुरबाड तालुक्यातील शिवळे वडाचा पाडाचा येथे  मुरबाड तहसिलदार कार्यालयाकडुन बांधकाम थाबवण्याचे आदेश असतानाही टेेक्नोक्रॉप्ट कंपनीने कंपनीचे बांधकाम सुरु ठेवुन आदेशाला केराची टोपली दाखवली होती.
          शिवळे परिसरातील वडाचा पाडा येथिल गट नं. 380 मध्ये परस्पर विक्री केलेल्या जमिनीवर टेेक्नोक्रॉप्ट कंपनी ने बांधकाम सुरु केल्याने हे बांधकाम त्वरीत थांबवण्याची मागणी या जमिनीचे वारसदार शेतकरी वर्गाने मुरबाड तहसिलदार, जिल्हाधिकारी,प्रातांधिकारी यांच्याकडे दाद मागितली व या मागणीचा विचार करुन तहसिलदार मुरबाड यानी बांधकाम थांबवण्याचा आदेश ही दिले होते.
           शेतकरी वर्गाच्या मते सदर जमिनीचे  संगनमताने खोटी कागदपत्र बनवुन विक्री  करण्यात  आली व या जागेचे  कल्याण प्रांताधिकीरी कार्यालयाकडे अकृषिक परवानगी साठी अर्ज दाखल केल्यावर एका वर्तमान पत्रात जाहीरात पाहिल्यावर या जमिनिचे मुळ मालक  कै. भिका धर्मा खापरे याचे वारस यांनी लक्षात येताच या अकृषिक परवानगी वर हरकत घेतली होती.या  हरकती नंतर कुठलीही परवानगी नसताना टेेक्नोक्रॉप्ट या कंपनीने या जागेवर बांधकाम केले . टेेक्नोक्रॉप्ट कंपनीने या जमिनिवर कृषि पुरक शितगृह ऊभारण्यासाठी  परवानगी मागितली होती.  प्रत्यक्षात या जागेवर ईंजिनिअरिग प्रोजेक्टचे स्ट्रक्चर बनविण्याचे काम सुरु होते. या बांधकामाविरोधात  तक्रार केल्यावर या बांधकामाला मंडळाधिकारी व तहसिलदार यांच्याकडुन स्थगिती देण्यात येवुन सक्षम अधिकाऱ्याची परवानगी नसल्याने महाराष्ट्र जमीन अधिनियम  1966 चे कलम 45 प्रमाणे कारवाई करणार असा आदेश दिला होता. परंतु या आदेशाला न जुमानता बांधकाम सुरु ठेवल्याने   सदर प्रकारा विरोधात शेतकरी वर्गाने मुरबाड दिवाणी न्यायालयात दावा केला होता. या दाव्याची सुनावणी सुरू असताना मुरबाड दिवाणी न्यायालयाने सहा नोव्हेंबर रोजी कंपनीला काम बंद करण्याचे आदेश देत मनाई हुकूम जारी केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कंपनीच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश झाला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *