डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने मराठी रंगभूमी दिनानिमित्त कलाकारांचा सत्कार

547

पुणे : (प्रतिनिधी,सचिन दांगडे) – आपल्या कलेतून रसिक प्रेक्षकांची सेवा करणाऱ्या कलाकारांचा मराठी रंगभूमी दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. समितीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी टिळक स्मारक मंदिर येथे चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची भेट घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘महामानव’ हे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे, प्रमोद रननवरे, अशोक जाधव, अभिजित बोरा, विकास कांबळे, सागर पानसरे उपस्थित होते. मराठी नाट्य व चित्रपट क्षेत्रात वैविध्यपूर्ण तसेच उल्लेखनीय काम होत आहे. नागराज मंजुळे यांनी आपल्या दिग्दर्शनातून, लेखनातून मराठी चित्रपट सृष्टीला एक वेगळा आयाम दिला आहे. तसेच मेघराज राजेभोसले यांनी महामंडळाच्या माध्यमातून मराठी कलाकारांना प्रोत्साहन व सन्मान देण्यासाठी योगदान दिले आहे, अशा भावना शशिकांत कांबळे यांनी यावेळी व्यक्त केल्या.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *