मुरबाड मधील १२३ वर्षीची ऐतिहासिक धर्मशाळा झाली जमीनदोस्त : नगरपंचायत बनवणार येथे विश्रांतीगृह 

444
           मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड तालुक्यातील एकमेव श्रीमंत भाऊशेट केशवसेट तेलवणे यांनी शके १८२२  सन १९०१ मध्ये मुरबाड शहरात तत्कालीन परिस्थिती पाहून धर्मशाळा बांधली होती.  याच वास्तूत मुरबाड ग्रामपंचायतची १९२३ रोजी स्थापना झाली व याच वास्तुतून मुरबाड शहराचा कारभार जवळजवळ ७० वर्ष मुरबाड ग्रामपंचायतने पाहिला.  मात्र या वास्तूला मुरबाड नगरपंचायतने  जमीनदोस्त करून या ठिकाणी मुरबाड नगरपंचायतीचे विश्रामगृह बनवण्यासाठी काम सुरू केले आहे. यामुळे मुरबाड शहरात ही ऐतिहासिक वास्तू जरी जमीनदोस्त होत असल्याचे जाणवत असताना मुरबाड मुरबाड मात्र बदलत असल्याचे दिसत आहे.
    मुरबाड येथील शिवाजी महाराज चौकात पुर्वी एक बाजारपेठ होती.  याच परिसरात ब्रिटिशकालीन तहसीलदार कार्यालय व मुरबाड पोलीस ठाणे होते.  आज ही दोन्ही कार्यालय नवीन वास्तूत स्थलांतरीत झाल्याने ही जुनी वास्तू पडीत झाली आहे.  मात्र मागील काही वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते दिपक खाटेघरे यांनी ही ब्रिटिश कालीन इमारत हेरिटेज वास्तू म्हणून जतन करून मुरबाड शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आंदोलन छेडले होते. मुरबाड शहरातील जुन्या आठवणी मोडीत निघत असताना जवळजवळ ७० वर्ष मुरबाड शहराचा ग्रामपंचायत माध्यमातून ज्या वास्तुतून कारभार चालला व १२३ वर्षा पूर्वी मानवता धर्मातून पायी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विश्रांती साठी बांधलेली श्रीमंत भाऊशेट केशवसेट तेलवणे यांनी बनवलेली धर्मशाळा ही एक आठवण म्हणून जुन्या मुरबाड करांना स्मरणात राहणार आहे.  मात्र या जागेवर बनवले जाणारे विश्राम गृह याला काय नाव मिळते या कडे आता सगळ्या मुरबाड करांचे लक्ष लागले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *