आधारकार्ड विना विध्यार्थी पालक व शिक्षक वर्गाची धावपळ, आधार विना अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहण्याची शक्यता  

577
        मुरबाड,ठाणे (प्रतिनिधी : जयदीप अढाईगे) – मुरबाड तालुक्यातील शहरी व दुर्गम भागातील विध्यार्थी पालक शिक्षक यांची आधारकार्ड विना शिष्यवृत्ती योजना घेण्यासाठी चांगलीच धावपळ सध्या होत आहे. मुरबाड तालुक्यात शिवळे व म्हसा या ठिकाणी सध्या आधारकार्ड केंद्र सुरू आहेत.  मात्र ही  ठिकाणे सर्वांनाच सोयीची नसल्याने अनेक विद्यार्थी व नागरिक आजही आधारकार्ड विना आहेत.  व याच मुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे फॉर्म अपूर्ण असल्याने या योजनेपासून अनेक विध्यार्थी वंचित रहाणार असा सूर शिक्षक व पालक वर्गातून उमटत आहे.
    तालुक्यात यापूर्वी गावागावात आधारकार्ड साठी रंगारांगा लावून लोकांनी आधारकार्ड बनवले. मात्र या आधारकार्ड मधील पुरावे देऊनही झालेल्या चुका दुरुस्ती साठी नागरिक, विध्यार्थी, पालक, यांना नाहक आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सध्या सहन करावा लागत आहे.  असे असताना शिष्यवृत्ती साठी लागणाऱ्या बँक खात्यासाठी ही आधारकार्ड लागत असल्याने व आधारकार्ड विना बँक खाते व शिष्यवृत्ती मिळणे कठीण झाल्याने निदान शाळा स्तरावर तरी तातडीने फिरते आधारकार्ड केंद्र निदान सुरू करावे अशी मागणी शिक्षक,पालक,विद्यार्थी वर्गातून होत आहे.  जेणे करून विध्यार्थी वर्गासह नागरिकांनाही याचा फायदा होईल. सरकारने याचा विचार करून तालुक्यातील शाळांमध्ये आधार कार्ड तातडीने काढून मिळण्याची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी सर्वसामान्यामधून होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *