मुरबाड मधिल ट्रॉमाकेअर सेटंरच काम बंद : ट्रॉमाकेअर बनलेय रोमान्स व पार्किंगचा अड्डा   

809
       मुरबाड,ठाणे (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड ग्रामीण रुग्णालया शेजारी गेल्या साडे चार वर्षा पासुन ट्रॉमाकेअर सेटंर चे काम अतिशय कासव गतीने सुरु असुन सदर काम सध्य स्थितीस बंद असल्याने हे  ट्रॉमाकेअर सेंटर सध्या रोमान्स सेंटर व पार्किंग झोन बनल्याने आरोग्य विभागाची याबाबत किती तत्परता आहे हे यातुन दिसून येत आहे. जर या ट्रॉमाकेअर सेंटरचे काम आता पर्यंत पूर्ण झाले असते तर अनेक आपघातग्रस्ताचे प्राण वाचवण्यात यश आले असते अशी खंत मुरबाड मधिल नागरिक व्यक्त करत आहेत.
    मुरबाड शहर हे केद्रबिंदु असुन मुरबाड-कर्जत- पुणे मुरबाड -नाशिक ,मुरबाड – कल्याण ठाणे, मुरबाड -बदलापुर, मुरबाड – माळशेज – नगर असे दळण वळणाच्यादृष्टीने  महत्वाचे रस्ते येथुन गेले असल्याने कुठल्याही ठिकाणी आपघात झाल्यास मुरबाड ग्रामिण रुग्णालयात पाठविले जाते. हीच बाब लक्षात घेऊन आरोग्य विभाग व आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून हे काम सुरू झाले.  मात्र हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरले आहेत. सदर काम हे सध्या बंदच  असल्याने या वास्तुचा उपयोग प्रेमीयुगलांचा अड्डा  व वाहन चालकांचा पार्किंग झोन बनलाअसल्याचे पाहावयास मिळत आहे.
    ट्रॉमाकेअर सुरु  झाल्यास स्वतंत्र आपघात विभाग, सर्व स्टाप मिळणार असे आरोग्य संचालनाने यापुर्वी सांगितले आहे. मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे नुकतेच लाखो रुपये खर्चून डागडुजी करून नूतनीकरण केले तर तर याच आवारात नव्या इमारतीचे काम सुरू आहे.  मात्र ट्रॉमाकेअर सेंटर चे काम बंद असल्याने आरोग्य प्रशासनाची याप्रश्नी उदासीनता दिसून येत आहे.  या ट्रॉमाकेअर सेंटरच्या कामाच्या पूर्णत्वास कधीचा मुहूर्त मिळतो ? कि, आणखी किती दिवस हे पार्कींग झोन व प्रेमीयुगलांचा अड्डा रहाणार या कडे मुरबाड परिसरातून सर्वांचे लक्ष लागले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *