कल्याण-माळशेज राष्ट्रीय महामार्ग 61 वरील उखडलेल्या साईड पट्टी मुळे मिळतेय अपघातास निमंत्रण 

628
       मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – कल्याण – माळशेज राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढून मृत्यु ची संख्या ही वाढली आहे. हा महामार्ग शहाड येथून सुरू होतो. यातील शहाड ते म्हारळ या रस्त्याच नुकतंच काँक्रीटीकरण पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर असून म्हारळ ते माळशेज पर्यंत दरवर्षी महामार्गाची डागडुजी व साईड पट्टी बनवली जाते.  मात्र प्रत्येक वेळी ही कामे थुकपट्टी केल्यासारखे होत असल्याने साईड भरावा मुळे अनेक अपघात घडतात मात्र वाहनचालकाकडून   या साईड भरावाकडे दुर्लक्ष केले जाते. साईड भराव हे निधी कमावण्याचे  साधन बनले असून साईड पट्टी बनवताना कुठल्याही तांत्रिक पद्धत वापरली जात नसल्याचे दिसून येत आहे.  यामुळे या महामार्गावरील साईड पट्टी अपघातास निमंत्रण देत असून महामार्गावरील अधिकारी याबाबीकडे गंभीरपणे  पाहत नसल्याचे बोलले जात आहे.
       या महामार्गावरील शहाड ते मुरबाड देवगाव पर्यन्त  कल्याण उपविभागीय कार्यालय तर मुरबाड देवगाव ते माळशेज घाट पर्यंत मुरबाड उपविभागीय अधिकारी कार्यभार सांभाळतात.  म्हारळ ते देवगाव मुरबाड पर्यंत अनेक ठिकाणची साईड पट्टीच नाही तर नुकत्याच झालेल्या आपघात सत्रामुळे मुरबाड उपविभागीय कार्यलयाकडून  साईड पट्टीचे काम हाती घेतले मात्र ही साईड पट्टी बनवताना  रस्त्यालगत असलेली काचा , प्लास्टिक ,कचरा युक्त भराव  टाकून साईड पट्टी भराव सुरू असताना सामाजिक कार्यकर्ताच्या तक्रारी मुळे  काम बंद करून योग्य पद्धतीने साईड पट्टी  बनवणार असल्याचे मुरबाड उपविभागीय अधिकारी पाटील यांनी सांगितले. कल्याण माळशेज या महामार्गावर वाहतूक प्रमाण वाढल्याने  व अरुंद रस्त्यामुळे  वाहन चालकांची ही कोंडी होताना दिसत आहे.  मात्र म्हारळ ते  माळशेज पर्यंतच्या वळणदार रस्त्यावर साईड पट्टी  मजबूत बनवल्यास अपघात टळू शकतात. यामुळे या मार्गावर साईड पट्टीची काम थुकपट्टी सारखे नको अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *