जागतिक एड्स दिनानिमित्त वाड्यात रॅली व मार्गदर्शन शिबीर संपन्न

1045

   वाडा,पालघर : (प्रतिनिधी,संजय लांडगे) – जागतिक एड्स दिनानिमित्त वाडा ग्रामीण रुग्णालयात व जिजाऊ व्यावसायिक प्रशिक्षण संस्था यांच्या विद्यमाने वाडा येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तर जिजाऊ व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यलयात तरुण तरुणींसाठी एड्स व टीबी विषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. १डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. सदर कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयात वाडा येथील प्रयोग शाळा तंत्रज्ञ शैला पाटील, वासुदेव हांडेकर, किशोर सोनटक्के, औषध निर्माण अधिकारी विनोद चौधरी, पाणी नमुना तपासणीस मनाली पाटील आणि जिजाऊ महाविद्यालय येथील  प्राचार्य किरण सर, विजय सर, रुपाली मॅडम, प्रणाली मॅडम, डोहाळे सर आदी उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *