शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे यमाईच्या पोकळ दरा परिसरात वास्तव्यास असणारे भाऊसाहेब कचरू पोकळे यांच्या शेतात बांधलेल्या घोडीवर आज दि. ०४ ला पहाटे एक च्या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पोकळे यांची ३ वर्षांची घोडी ठार झाली.सध्या शिरूर,आंबेगाव, जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे पशुधनावरील हल्ले वाढले आहे. बारमाही पाण्याच्या उपलब्धतेमुळे उसाचे क्षेत्र व बागायती पिके मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांना आपल्या ऊसातील अधिवासाला धोका वाटू लागल्याने व पिल्लांच्या काळजीपोटी ते सैरभैर होताना दिसत आहेत. कवठे येमाई परिसरात शेतकऱ्यांना बिबट्यांचे सध्या दिवसाढवळ्या देखील दर्शन होत आहे. त्यातच त्याचे नैसर्गिक खाद्य असणारे जंगली प्राणी कमी झाल्यामुळे बिबटयांनी आपला मोर्चा शेतकऱ्यांच्या पशुधनावर वळविला आहे.
कवठे येमाई येथील पोकळे वस्ती सायंबा मंदिर परिसरात वास्तव्यास असणारे भाऊसाहेब कचरू पोकळे यांच्या ३ वर्षीय बैलगाडा शर्यतीत घाटात धावणाऱ्या सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या घोडीवर आज पहाटे एकच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून घोडीचा फडशा पाडला. दिवसा ढवळ्या देखील बिबट्या दिसत असल्याने लहान मुले व महिलांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कवठे येमाई येथील पोकळे वस्ती सायंबा मंदिर परिसरात वास्तव्यास असणारे भाऊसाहेब कचरू पोकळे यांच्या ३ वर्षीय बैलगाडा शर्यतीत घाटात धावणाऱ्या सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या घोडीवर आज पहाटे एकच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून घोडीचा फडशा पाडला. दिवसा ढवळ्या देखील बिबट्या दिसत असल्याने लहान मुले व महिलांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेचा पंचनामा वनकर्मचारी हनुमंत कारकुड यांनी वनपाल गणेश पवार, वनरक्षक नारायण राठोड वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली केला आहे.
तर नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या मृत पशुधनाचा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ पाठविण्यात येईल व शासन नियमाप्रमाणे संबंधित शेतक-यास नुकसान भरपाई मिळेल असा विश्वास शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.
शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेताकडे जावे लागते तसेच महिलांना देखील खुरपणी साठी शेतात जावे लागते. जवळच असणाऱ्या उसाच्या क्षेत्रांत दबा धरून बसलेला बिबट्या कधीही हल्ला करू शकतो. त्यामुळे या परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. कवठे येमाईच्या चारही बाजूचा परिसर उसाने व्यापला असल्यामुळे सर्व ठिकाणी त्याचे दर्शन व पाळीव जनावरांवर सातत्याने हल्ले वाढलेले पहावयास मिळत आहे.बिबट्यांची नसबंदी केल्याशिवाय त्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण येणार नाही त्यामुळे शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने घेण्याची गरज शेतकरी, नागरीकांकडुन व्यक्त होत आहे.