समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे येमाई येथील गावठाणात असलेल्या सुमारे ७०० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक व पुरातन असलेल्या श्री हनुमान मंदिराचा हा वारसा जतन ठेवण्याकामी या भव्यदिव्य व दगडी बांधकामातील कलाकुसर युक्त ठेवा असलेल्या मंदीराचा जीर्णोद्धार सुरु करण्यात आला असून येथील श्री गुरुदेव दत्त फ्रेंडशिप ग्रामविकास प्रतिष्ठानच्या युवकांनी व समस्त ग्रामस्थांनी हे ऐतिहासिक कार्य हाती घेतले असून याकामी ग्रामस्थ ही मोठ्या यथाशक्तीने योगदान देत आहेत. मंदिराच्या परिपूर्ण जीर्णोद्धारासाठी मोठा खर्च येणार असल्याने दानशूर व धार्मिक क्षेत्राची आवड व मंदिरांसारखा ऐतिहासिक वारसा जातं राहावा अशी मनोकामना असणाऱ्या थोर देणगीदारांनी या कामी योगदान देण्याचे आवाहन श्री गुरुदेवदत्त फ्रेंडशिप ग्रामविकास प्रतिष्ठानचे युवक व समस्त ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
कवठे गावठाणातील श्री हनुमान मंदिर सकल हिंदू बांधव व सर्व धर्मियांचे श्रद्धेयस्थान असून एक जागृत देवस्थान म्हणून,नवसाला पावणारा हनुमान म्हणून या देवालयाची ख्याती आहे. येथे शेकडो भाविक भक्त नियमित श्रद्धेने व धार्मिकतेने दर्शन घेत असतात. आता ता भव्य व पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार सुरु करण्यात आला असून हे काम येथे येणाऱ्या व जाणाऱ्या भाविक,भक्त,नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.



या धार्मिक कार्याकरिता आर्थिक व वस्तुरूपी योगदान देवू इच्छिणाऱ्या श्रद्धेय भाविकांनी नितिन मुखेकर यांच्या – ८८८८५८३८३८ या ,अमोल ढोरके यांच्या -९५९५००८६५५ या व प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष ओंकार बांगर यांच्या ९८९०२९२४४५ या मोबाईल क्रमांकावर देणगी पाठवण्याचे आवाहन तसेच सोबत टाकलेल्या स्कॅनर वर देणगी रुपी मदत पाठविण्याचे आवाहन प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थांच्या वतीने डॉ. विकासराव शेटे,अनिकेत रेणके,अक्षय भंडारी,माजी अध्यक्ष तेजस काळे,विकास जाधव,संकेत चव्हाण,श्रेयश काळे यांनी केले आहे.