पुण्याच्या वंडर सिटी ग्राउंडवर होणार १५ व्या वर्षी भारती विद्यापीठ महिला दहीहंडी सोहळा – अनिल रेळेकर यांची माहिती 

समाजशील न्यूज नेटवर्क,कात्रज,पुणे : (देवकीनंदन शेटे,कार्यकारी संपादक) – सामाजिक बांधिलकी जपत अखिल भारती विद्यापीठ महिला दहीहंडी उत्सव व सण साजरी करणारी दक्षिण पुण्यातील पहिली व एकमेव महिला दहीहंडी असून १५ वर्षात यशस्वी पदार्पण करताना या सोहळ्यास एक विशेष महत्त्व प्राप्त झाले असल्याची माहिती युवक्रांती पोलीस मित्र संघटनेने पुणे शहर अध्यक्ष अनिल रेळेकर यांनी समाजशील शी बोलताना दिली.तर ही खास महिलांसाठी आयोजित करण्यात येत असलेली विशेष दहीहंडी दि १६ऑगस्ट रोजी वंडर सिटी ग्राउंड,पुणे येथे ठीक संध्याकाळी सात वाजता सुरू होणार असून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा विजयी संघाला रुपये १,११,१११ /- इतके रोख बक्षीस, सन्मानचिन्ह बहाल करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सौ.गौरी वनारसे – वायचळ (महाराष्ट्रातील पहिली महिलाउत्कृष्ठ संबळ वादक), विनीत चव्हाण (कलाकार,लागीर झालं जी फेम), स्नेहल भोपळे (मिसेस इंडिया), तेजश्री वाळवलकर (अभिनेत्री,उंच माझा झोका, फेम) व मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे विशेष सहकार्य पोलीस तपास क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य सीनियर (महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पुणे शहर अध्यक्ष), तसेच युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण अधिकार संघटनेच्या विविध पदाधिकारी,सदस्य यांचा या दहीहंडी कार्यक्रमात विशेष सहभाग असणार आहे. या महिला दहीहंडी चे आयोजक सुरज (सोनू) वाळुंज मित्रपरिवार हे आहेत. असे महिला दहीहंडी चे समन्वयक अनिल रेळेकर  यांनी सांगितले. दहीहंडी साजरी करताना समाजामध्ये सलोखा आणि पावित्र राखले गेले पाहिजे आणि आपली संस्कृती जपली गेली पाहिजे. आज सर्वच क्षेत्रात महिला प्राधान्याने आघाडीवर आहेत. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या दहीहंडी उत्सवाला  विशेष महत्त्व प्राप्त झाले असून दक्षिण पुण्यातील कात्रज मध्ये होणाऱ्या या  दहीहंडी सोहळ्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन आनंद घ्यावा असे आवाहन ही अनिल रेळेकर यांनी केले आहे.
    
       दक्षिण पुण्यातील कात्रज मध्ये होणाऱ्या महिलांच्या या आगळ्यावेगळ्या दहीहंडी सोहळा उपक्रमाचे युवक्रांती पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्री ताई अहिरे,राष्ट्रीय युवती उपाध्यक्षा श्रीमती वर्षाताई नाईक,राष्ट्रीय महिला कार्याध्यक्षा अमृत ताई पठारे,राष्ट्रीय महिला मार्गदर्शक वैशाली ताई बांगर,प्रदेश महिला अध्यक्षा वसुधा नाईक,राष्ट्रीय उपाध्यक्ष नाना महाराज कापडणीस,राष्ट्रीय संघटक डॉ.राजेश्वर हेंद्रे,राष्ट्रीय मिडीया प्रमुख मुख्य मार्गदर्शक,प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान विकास मंच,वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे,महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष शिवाजीराव शेलार,पुणे शहर अध्यक्ष अनिल रेळेकर,पुणे शहर उपाध्यक्ष समीर नाईक व सदस्य,पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds